वन्यजीव छायाचित्रकारांनी टिपलेली बिबट्याचे फोटो अनेकदा लोकांची वाहवा मिळवतात. यामध्ये, असे फोटो देखील आहेत ज्या आश्चर्यकारक असण्याबरोबरच लोकांना खूप विचार करायला लावतात. ते असे फोटो असतात ज्यात लपलेला प्राणी साध्या दृष्टीक्षेपात शोधण्याचे आव्हान देतात. फोटोग्राफर सौरभ देसाईने शेअर केलेल्या या पोस्टमध्येही असाचं एका हिम बिबट्याचा फोटो आहे.
“या हिम बिबट्याच्या फोटोने मैलांचा पल्ला गाठला आहे आणि मला आनंद आहे की लोकांना या फोटोत हिम बिबट्या शोधण्यात मजा येत आहे,” फोटोग्राफरने एका फोटोसह इतर काही अविश्वसनीय फोटो शेअर करताना लिहिले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या इमेजमध्ये बर्फाचा बिबट्या साध्या नजरेने शोधता येत नाहीये.
(हे ही वाचा: ‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच!)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
पोस्ट सुमारे १५ तासांपूर्वी शेअर केली गेली आहे. शेअर केल्यापासून, पोस्टला २,५०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि संख्या वाढतच आहे. पोस्टवर प्रतिक्रिया देताना लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या. काहींनी त्यांचे प्रतिसाद इमोजी, विशेषत: फायर किंवा हार्ट इमोटिकॉनसह आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
(हे ही वाचा: चालत्या रुग्णवाहिकेत दारू पार्टी! बिअर पीत असलेल्या लोकांचा Video Viral)
बिबट्याच्या या आश्चर्यकारक फोटोबद्दल तुमचे काय मत आहे? पहिल्या फोटोतील बिबट्याला शोधण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला?