सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ,फोटो व्हायरल होत असतात. या व्हायरल झाललेल्या फोटोमधले काही फोटो फार विचार करायला लावतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून मोठा प्रश्न पडला आहे. या फोटोकडे जर तुम्ही नीट बघितलं नाही तर तुमचं उत्तर नक्कीच चुकेल.या व्हायरल फोटोकडे बघितल्यावर अनेकांना हे घोडे आहेत असचं वाटत आहे, परंतु सत्य काही वेगळेच आहेत.
तुम्हाला कोणता प्राणी आहे असं वाटत?
हा फोटो प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बेवर्ली जौबर्ट यांनी काढला आहे. हा फोटो त्यांनी २०१८ मध्ये त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. जो अजूनही व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी माहिती दिली की, हा फोटो आफ्रिकेच्या दक्षिण भागात असलेल्या बोत्सवाना मक्गाडिकगडी तलावाचे आहे.
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
(हे ही वाचा: Viral: नवजात बाळावरही चढला ‘पुष्पा’ फिवर! IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला Video)
काय आहे उत्तर?
हा फोटो इतका लोकप्रिय झाला आहे की लोकांनी तो खूप शेअर केला आहे. तुम्हाला फोटो बघून अजूनही उत्तर समजल नसेल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटते की ते घोड्याचे आहे, परंतु जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला कळेल की त्यात बरेच झेब्रा आहेत, ज्यांची सावली घोड्यासारखी दिसते.