Viral Photo: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, सोशल मीडियावर लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा पाहायला मिळतात. सध्या असाच एक हटके फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यात एक नवरदेव चक्क आपल्या मित्रांसोबत असं काहीतरी करतोय; ज्याचा कोणी कधीही विचारही केला नसेल.

सोशल मीडियावर लग्नातील अनेक हटके व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना आपण पाहतो. नुकताच काही दिवसांपूर्वी एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात वधू-वराने तो व ती खाली बसल्यावर गळ्यात हार घातला होता. एकमेकांना लग्नात वरमाला घालण्याची ही नवीन हटके पद्धत खूप व्हायरल झाली होती. दरम्यान, आतादेखील असाच एक हटके फोटो समोर आला आहे; ज्यात नवरदेव चक्क ल्युडो खेळताना दिसत आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

हा व्हायरल फोटो इन्स्टाग्रामवरील @ahmiyat.__ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, भरमंडपात विधी सुरू असताना नवरदेव त्याच्यामागे बसलेल्या मित्रांसोबत ल्युडो खेळण्यात मग्न आहे. नवऱ्याच्या पुढे बसलेले गुरुजी लग्नातील मंत्र पठण करताना दिसत आहेत; पण या पठ्ठ्याचे लक्ष मित्रांसोबत ल्युडो खेळण्यावर आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, युजर्स त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या फोटोला आतापर्यंत ७९ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. त्याशिवाय अनेक जण या फोटोवर कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय, “नवऱ्याला लग्नाच्या दिवशी जिंकायचे आहे.” दुसऱ्याने लिहिलेय, “लग्नानंतर त्याची बायको याच्या आयुष्यासोबत असंच खेळणार.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “आमच्या इकडे असंच असतं.” आणखी एकाने लिहिलेय, “मीपण असंच करणार माझ्या लग्नात”

हेही वाचा: फॅमिली असावी तर अशी! प्रियकराला ब्रेकअपचा मेसेज पाठवून तरुणीने साजरा केला जल्लोष; कुटुंबीयांनी वाजवल्या टाळ्या… VIDEO पाहून व्हाल चकित

पाहा फोटो:

दरम्यान, याआधीदेखील अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; ज्यात नवरा भरमंडपात कॉलवर मित्रांशी गप्पा मारताना दिसत होता. त्यावेळी नवऱ्याकडे संपूर्ण लग्नातील लोक आश्चर्याने पाहत होते.

Story img Loader