ट्रॅफिकमध्ये अडकून राहणे किती त्रासदायक आहे हे सगळ्याचं माहित आहे. मेट्रोपॉलिटन शहरात तर ट्रॅफिक असतच. तिकडे लोक नेहमी घाईत असतात आणि त्यामुळे गाड्या अक्षरशः कुठेही घुसण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे तर अधिकच ट्रॅफिक निर्माण होते. मुळात, जेव्हा तुम्ही भारतातील रहदारीच्या नियमांचा विचार करता लोक नियम जास्त पाळत नाहीत. तथापि, आपल्याच देशातील एक दुर्मिळ फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक वाहतूक नियमांचे पालन कसे करतात हे दर्शवित आहे.
हा फोटो संदीप अहलावत यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. हे मिझोराममधील एक रस्ता दर्शविते जेथे प्रवासी सीमांकित रेषेत व्यवस्थित उभे राहण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी इतर कोणत्याही वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही किंवा बेशिस्त वर्तनही करत नव्हते.
(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक)
या पोस्टला कॅप्शन देण्यात आले आहे की, “मी फक्त मिझोराममध्येच अशी शिस्त पाहिली आहे. तेथे कोणत्याही फॅन्सी कार नाहीत, मोठा अहंकार नाही, रोड रेज नाही, हॉर्न वाजवणे नाही आणि ‘तू जानता नहीं है मेरा बाप कौन है..’.. कोणीही त्यात नाही. घाई नाही… आजूबाजूला शांतता आणि प्रसन्नता आहे.”
(हे ही वाचा: Viral: सोने तस्करीचा फॅशनेबल प्रयत्न; बुरख्यालाच सोन्याचे मणी लावून भारतात आली पण…)
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील या फोटोची प्रशंसा केली होती ज्यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट पुन्हा शेअर केली. ते मिझोरामच्या लोकांकडून प्रेरित झाले आणि त्यांनी लिहिले, “किती छान फोटो आहे; रस्त्यावरील मार्करवरून एकही गाडी भटकत नाही. प्रेरणादायी, मजबूत संदेशासह: आमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे हे आपल्यावर अवलंबून आहे.”
(हे ही वाचा: ‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच!)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
इंटरनेटवरील लोकांनी यास सहमती दर्शविली आणि या असामान्य दृश्याचे कौतुक केले जेथे एकाही व्यक्तीचा पाय रेषेच्या बाहेर नव्हता. त्यानंतर इतर अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या शहरांमधून असेच फोत्प शेअर केले आहेत.
(हे ही वाचा: “भारतात परत येईल तर माझ्या कुत्र्यासोबतच…” युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचा Video Viral)
एका वापरकर्त्याने सांगितले की, “भारतात अशी वाहतूक शिस्त प्रथमच पाहिली आहे. मिझोरामच्या लोकांना नतमस्तक आहे. आशा आहे की आपल्या देशात सर्वत्र याचा प्रसार होईल.” दुसर्या वापरकर्त्याने म्हटले, “भूभाग कोणताही असो, हे सामान्य ज्ञान आहे. तुम्ही ओव्हरटेक करता, अपघाताचा धोका असतो किंवा ट्रॅफिक जाम होण्याचा धोका असतो. प्रत्येकजण एकाच रांगेत, प्रत्येकजण त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकर पोहोचतो.”
(हे ही वाचा: पावनखिंड चित्रपटाच्या वेळी सांगलीच्या चित्रपटगृहात तरुणांनी दिली शिवगर्जना; अंगावर काटा आणणारा Video Viral)
असे दृश्य पाहिल्यावर प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्त पाळावी अशीच इच्छा होते. वेळ आणि मेहनत वाचेल याची कल्पना करा.