Man Tailoring Work In ATM : तुम्ही कधीतरी ‘एक पंथ दो काज’ ही हिंदी म्हण ऐकलीच असेल, या म्हणीचा अर्थ एका गोष्टीचे फायदे अनेक. हीच म्हण सत्यात उतरवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बँकेच्या एटीएममध्ये एका बाजूला पैसे काढण्यासाठीची मशीन आहे, तर दुसऱ्या बाजूला एक शिंपी मशीनवर बसून आरामात कपडे शिवतोय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हारल होतोय, ज्यावर लोकही विविध कमेंट्स करत आहेत.
अनेक जण या व्यक्तीच्या जुगाडचे कौतुक करत आहेत, पण या व्यक्तीने चक्क एटीएममध्ये साईड बिझनेस कसा सुरू केला पाहूयात.
हा व्हायरल फोटो स्टेट बँकेच्या एटीएमचा आहे, जिथे एका बाजूला एटीएम मशीन आहे आणि त्याच्या बाजूला या व्यक्तीने आपले शिलाई मशीन ठेवले आहे, ज्यावर बसून तो शिंपी काहीतरी शिवताना दिसत आहे. अगदी आरामात चांगल्या एसीच्या हवेत बसून हा शिंपी आपले काम करताना दिसतोय, यामुळे अनेक युजर्स या व्हिडीओवर खूप कमेंट्स करत आहेत.
More Viral News : “वाचवा मला!” पिटबुल कुत्र्यांचा डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; चाव्यांनी हात-पाय केले रक्तबंबाळ; थरारक video व्हायरल
‘काम थांबले नाही पाहिजे…’ युजर्सच्या मजेशीर कमेंट्स
इन्स्टाग्रामवर naughtyboii65 नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एटीएममध्ये शिवणकामाचे दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला. ज्यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘काम एटीएममध्ये बसून का करेना, पण ते थांबले नाही पाहिजे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘पार्ट टाइम जॉब चांगला आहे.’ तर तिसऱ्या युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले की, ‘तुम्ही एटीएममधून फाटलेल्या नोटाही शिवणार का?’ त्याचप्रमाणे, अनेक युजर्सनी या व्यक्तीच्या विचारसरणीचे कौतुक केले आणि लिहिले की, ‘येथे बरेच आश्चर्यकारक लोक आहेत.’ तर एका युजरने लिहिले की, ‘भारतीयांच्या जुगाडची बरोबरी कोणी करू शकत नाही.’ त्याचप्रमाणे या व्यक्तीचे कौतुक करताना एका युजरने लिहिले की, ‘कामगार माणूस कुठेही काम करू शकतो.’