Viral Photo Show Groom Was Spotted Playing Ludo : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय क्षण असतो, त्यामुळे हा दिवस कसा खास होईल याकडे प्रत्येकाचे लक्ष असते. खूप वर्षांपासून एकत्र रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपल्या जोडीदाराबरोबर लग्न होणं हा एक वेगळा अनुभव असतो, त्यामुळे लग्नसमारंभात नवरा व नवरीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगताना दिसतात. पण, सगळेच सारखे नसतात हे स्पष्ट करणारा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये नवरदेवाला लग्न विधीपेक्षा काहीतरी वेगळंच महत्त्वाचे आहे.

व्हायरल फोटो लग्नमंडपातील आहे. मंडपात लग्नाच्या विधी सुरू झालेल्या असतात. पुजारी लग्नाच्या विधी पार पाडत असतात आणि फोटोग्राफर लग्नादरम्यानचे खास फोटो काढण्यासाठी तयार असतो. पण, या सगळ्यात एका अज्ञात व्यक्तीला अजब दृश्य पाहावयास मिळालं आहे. नवरदेवाचे दोन मित्र त्याच्या मागच्या बाजूला बसलेले असतात. वेळ जात नव्हता म्हणून की काय, ते मोबाइलवर एक गेम (खेळ) खेळू लागतात. नवरदेव आणि त्याचे मित्र मिळून कोणता खेळ खेळतात व्हायरल पोस्टमधून (Viral Photo) तुम्हीसुद्धा बघा…

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ

हेही वाचा…​लक्षात राहणारी मैत्री… ! २३ वर्षानंतर रिक्रिएट केला क्षण, VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे ते दिवस

पोस्ट नक्की बघा…

स्मार्टफोनवर लुडो खेळण्यात मग्न

मोबाइलमध्ये असलेला लुडो गेम प्रचंड लोकप्रिय आहे. सुट्ट्यांच्यादरम्यान आपण तासनतास त्यावर वेळ घालवत असतो. पण, व्हायरल पोस्टमध्ये (Viral Photo) तुम्ही पाहिलं असेल की, चक्क नवरदेव लग्नाच्या दिवशी हा खेळ खेळताना दिसत आहेत. दोन मित्र आणि नवरदेव स्मार्ट फोनवर लुडो खेळण्यात मग्न आहेत. हे पाहून नेटकऱ्यांनी पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @Muskan_nnn या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्ट शेअर करताच ४,००,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पोस्ट पाहून नेटकरी मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय की, ‘”कुछ भी हो जाए लुडो रुकना नही चाहिए (काहीही झाले तरी लुडो खेळणं थांबलं नाही पाहिजे )”, दुसरा युजर म्हणतोय की, “देख भाई, तू यहाँ भी हार गया और वहा भी’ (हे बघ भाऊ, तू इकडे हरलास आणि तिकडेपण) आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader