Viral Photo Shows A Small Village Got Its First Road : एखादी गोष्ट पहिल्यांदा मिळाल्यावर त्याचा आनंद काय असतो हे त्या व्यक्तीला विचारावे, ज्याने त्या गोष्टीसाठी अनेक वर्षे वाट पहिली, अनेक वर्ष संयम ठेवला किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी वाटेत येणाऱ्या अनेक संकटांवर मात केली. अनेक वर्षांनंतर त्या गोष्टीचा लाभ घ्यायला मिळाला की, आपल्याला त्याची किंमत कळते आणि नकळत मनात एक आदर निर्माण होतो. तर, आज असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये चिमुकल्यांनी केलेले कृत्य पाहून तुमच्याही डोळ्यांत नक्की पाणी येईल.
गावाकडे रस्ताबांधणी किती महत्त्वाची आहे हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि शेतात काम करणारे शेतकरी यांच्या एका गावातून दुसऱ्या गावाकडे जातात. त्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्यासाठी मजबूत रस्तेबांधणी अत्यंत आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी एका लहानशा गावात अनेक वर्षांनंतर पहिला रस्ता बांधण्यात आला आहे आणि तो धुळीपासून स्वच्छ ठेवण्यासाठी गावातील लहान मुलांनी काय केले ते व्हायरल पोस्टमधून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
पोस्ट नक्की बघा…
ज्या गोष्टीची आपल्याला पर्वाही नसते ती इतरांसाठी महत्त्वाची असू शकते
व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिले असेल की, पहिल्यांदा गावात रस्ता बांधल्यावर मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गावातील मुले आणि मुली रस्ता बघून खेळायला तर गेले; पण खेळण्यागोदर जणू काही आपण एका मंदिरात जातोय, असे समजून त्या प्रत्येक मुलाने आपली चप्पल नवीन रस्ता बनवला आहे, त्याच्या अगदी बाजूला काढून टाकली आणि ते अनवाणी खेळू लागले. या दिवसाची जणू काही त्यांनी अनेक वर्षे वाट पाहिली आणि तो क्षण त्यांच्या आयुष्यात आल्याचा आनंद त्यांनी अशा प्रकारे साजरा केला.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @stock.marketdiaries या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आयुष्यातील लहान क्षणांची कदर करा. कधी कधी ते सर्वांत जास्त महत्त्व देतात’, अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा पोस्ट पाहून भारावून गेले आहेत आणि त्यांना माहीत आहे की, एखाद्या गोष्टीचा सन्मान कसा करायचा, ज्या गोष्टीची आपल्याला पर्वाही नसते ती इतरांसाठी किती महत्त्वाची असू शकते याचा आपण अंदाज नाही लावू शकत आदी कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.