Viral Photo Shows BJP Members Protested Against Canada :शीख फुटीरतावाद्यांच्या कॅनडामधील कारवाया, खलिस्तानी चळवळ आणि भारत-कॅनडा संबंध हे दोन विषय वारंवार चर्चेत असतात. कॅनडाचे शीख कट्टरतावादी हरदीप सिंह निज्जर यांची ५ वर्षांपूर्वी हत्या झाली. त्यावरून दोन्ही देशांमध्ये वाद वाढला होता. भारताने निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. हत्येवरून वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडाने त्यांच्या उच्च राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर भारत आणि कॅनडाशी संबंधित पोस्टचा पूर आला आहे. याचदरम्यान लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा एक फोटो आढळला, ज्यामध्ये भाजपा सदस्य कॅनरा बँकेच्या शाखेबाहेर कॅनडाविरोधात आंदोलन करीत आहेत. पण, व्हायरल होणाऱ्या या गोष्टीमागचे नेमके सत्य काय? चला जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल ?

एक्स (ट्विटर) युजर वीणा जैन यांनी व्हायरल फोटो (Viral Photo ) शेअर करून, ‘अंधभक्त कॅनरा बँकेसमोर उभं राहून कॅनडाविरोधात आंदोलन करीत आहेत’, अशी कॅप्शन दिली आहे.

News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?

इतर युजर्सदेखील समान दाव्यासह हाच फोटो (Viral Photo) शेअर करीत आहेत.

हेही वाचा…लेकीची छेड काढणाऱ्याला कुटुंबाने दिला बेदम चोप; VIRAL VIDEO चर्चेत, पण नेमकं सत्य काय?

तपास :

व्हायरल इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्ही याबाबतचा तपास सुरू केला. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, २०२३ मध्ये हा फोटो (Viral Photo) मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात होता.

आम्हाला हा फोटो maalaimalar.com या वेबसाइटवर मिळाला.

https://www.maalaimalar.com/news/district/2020/08/30173003/1833721/Flagpole-Removal-bjp-demonstration.vpf?infinitescroll=1

बातमी तमीळ भाषेत होती. ध्वजस्तंभ हटविल्याबद्दल भाजपाच्या सदस्यांनी नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केल्याचे यामध्ये लिहिण्यात आले आहे. ही बातमी ३० ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध झाली होती आणि त्यामध्ये कॅनरा बँक कुठेही दिसत नाही; जी आज व्हायरल होणाऱ्या फोटोत दाखवली जात आहे.

आम्ही InVid टूलद्वारे इमेजवर इमेज फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यात आम्हाला आढळले की, इमेज डिजिटली बदलली गेली आहे. विशेषत: फोटोत जिथे कॅनरा बँकेचा बोर्ड दिसतो आहे. तो gifs या InVid टूलद्वारे इमेज फॉरेन्सिकचा वापर करून बदललेला फोटो आहे. त्यामुळे हा फोटो एडिटेड असल्याचे लक्षात येते.

निष्कर्ष : भाजपा सदस्यांनी कॅनरा बँकेबाहेर कॅनडाविरोधात आंदोलन केलं, या दाव्यासह व्हायरल करण्यात आलेला हा फोटो बनावट आहे. शेअर करण्यात आलेला फोटो २०२० चा आहे आणि तो डिजिटली एडिट करण्यात आला आहे. त्यामुळे व्हायरल केला जाणारा दावा खोटा आहे हे स्पष्ट होते.

Story img Loader