Viral Photo Shows Uber Cab’s Facilities : विमान प्रवास हवाहवासा वाटत असला तरीही तो थोडाफार खर्चीक असतो हे नाकारून चालणार नाही. विमान प्रवाशांना बिझनेस क्लास, इकॉनॉमी क्लास अशी दोन प्रकारची तिकिटे मिळतात. इकॉनॉमी क्लासचे तिकीट बिझनेस क्लासच्या तिकिटापेक्षा फार कमी असते. त्याचप्रमाणे प्रवाशांना विमानातील खाद्यपदार्थ किंवा इतर काही वस्तूंसाठीही पैसेही द्यावे लागतात. तर हाच मुद्दा अधोरेखित करीत एका सोशल मीडिया युजरने पोस्ट (Photo) केली आहे.
ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या कॅब बुक करताना आपण गाडी स्वच्छ आणि ड्रायव्हर चांगला असू देत, अशी इच्छा मनात धरतो. पण, जेव्हा Reddit युजर @Fancy-Past-6831 ने कामावर जाण्यासाठी कॅब बुक केली. तेव्हा मात्र त्याला आश्चर्यच वाटले. कारण- कॅबमध्ये प्रवेश करताच त्याला दिसले की, दिल्लीच्या उबर कॅब ड्रायव्हरने आपली कॅब अनेक सोई-सुविधांनी सुसज्ज केली आहे. त्यामध्ये मोफत स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, वाय-फाय आणि इतर अनेक सुविधांचा समावेश होता. तुम्हीसुद्धा नक्की बघा ही पोस्ट (Photo) …
पोस्ट नक्की बघा…
व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिले असेल की, प्रवासारम्यान Reddit युजरने अब्दुल कादीरच्या कॅबचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये गाडीच्या पुढे असणाऱ्या ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीटच्या मागच्या बाजूला ‘पाण्याची, कोल्ड्रिंकची बाटली, औषधे, टिश्यू, सॅनिटायझर, पावडर, शू पॉलिश, परफ्यूम, लिटिल हार्ट्स, गरीब मुलांसाठी दानपेटी आणि बऱ्याच गोष्टी त्याने प्रवाशांसाठी गाडीत व्यवस्थित लावून घेतल्या आहेत आणि प्रत्येक वस्तूसाठी काही ट्रे आणि कप्पेसुद्धा बनवून घेतल्याचे दिसत आहे.
फ्लाइटपेक्षा उत्तम सुविधा
सोशल मीडियावर ही पोस्ट Reddit युजरच्या @Fancy-Past-6831 या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ‘अब्दुल कादीर असे त्याचे नाव आहे. एका वर्तमानपत्राने त्यांच्याबद्दल बातमीसुद्धा प्रकशित केली होती. ज्याची हेडिंग ‘असा उबर ड्रायव्हर जो त्याच्या ग्राहकांना कधीही नाही म्हणत नाही… या वर्तमानपपत्राची प्रत त्याने कॅबमध्ये टांगून ठेवली आहे’, असा खास मेसेज आणि ‘फ्लाइटपेक्षा उत्तम सुविधा या कॅबमध्ये आहे’ अशी कॅप्शनसुद्धा कॅब ड्रायव्हरसाठी लिहिली आहे.