Viral Photo Shows woman forgot AirPods : कॉलेज किंवा ऑफिसला निघताना मोबाईलबरोबर एअरपॉड्ससुद्धा आपण आठवणीने घेऊन जातो. प्रवासात गाणी, सिनेमा, सीरियल, सीरिज बघण्यापासून ते ऑफिसमध्ये एखादा महत्त्वाचा कॉल किंवा घरी ऑनलाइन मीटिंग अटेंड करण्यापर्यंत एअरपॉड्सचा बऱ्याच गोष्टींसाठी उपयोग होतो. त्यामुळे कधीतरी आपण एअरपॉड्स घरी विसरलो, तर तो दिवस खूपच कंटाळवाणा वाटतो. तर, आज एका तरुणीबरोबर असंच काहीस घडलं आहे. ऑफिसला जाताना ती एअरपॉड्स घरी विसरते. पण, तिची आई जुगाड करून, तिचे एअरपॉड्स ऑफिसमध्ये पोहोचवते.
बहार बत्रा असे एक्स (ट्विटर) युजरचे नाव आहे. बहार बत्रा ऑफिसमध्ये पोहचते. पण, ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिला आठवले की, ती एअरपॉड्स घरीच विसरली आहे. तर हे कळताच तिने आईला डिलिव्हरी सेवेद्वारे एअरपॉड्स पाठविण्याचा सल्ला दिला. हा सल्ला आईने अमलात आणला तर खरा; पण, आईने त्यात एक जुगाडही केला आहे. आईने पिशवीतून किंवा एखाद्या बॉक्समधून नाही, तर एका वेगळ्याच वस्तूमधून एअरपॉड्स पाठवून दिले. नक्की काय घडलं ते व्हायरल पोस्टमध्ये (Viral Photo ) तुम्हीसुद्धा बघा…
पोस्ट नक्की बघा…
डब्यातून एअरपॉड्स पाठवून दिले…
व्हायरल पोस्टमध्ये (Viral Photo) तुम्ही पाहिलं असेल की, आईने स्टीलच्या डब्यातून एअरपॉड्स पाठवून दिले आहेत. एवढंच नाही, तर स्टीलच्या डब्याच्या आतमध्ये चांदीच्या रॅपरमध्ये हे एअरपॉड्स अगदी सुरक्षित ठेवलेले असतात. हे पाहून लेक थक्क होते आणि आईच्या कल्पनेचं कौतुक करते. अनेकदा ऑनलाइन वस्तूंची देवाणघेवाण करताना वस्तू हरवल्या जातात किंवा त्यांची चोरीही होते. त्यामुळे बहुधा आईला ही युक्ती सुचली असेल. म्हणूनच तिने स्टीलच्या डब्यात घालून हे एअरपॉड्स ऑफिसमध्ये पोहोचवले आहेत.
सोशल मीडियावर ही पोस्ट (Viral Photo) @Bahaarnotbahar या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आज माझे एअरपॉड्स घरी विसरले आणि कोणालाही न कळता ते डिलिव्हरी माणसाकडे सुरक्षितपणे पाठवायला मी आईला सांगितले आणि तिने ते डब्यात पॅक केले! इन अ डब्बा (IN A DABBA? ),’ अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे. नेटकरी या पोस्टवर आईचे कौतुक करताना दिसत आहेत. आई करू शकत नाही असं कोणतंच काम या जगात नाही’, “क्लासिक आईची रणनीती“, “आईला नेहमी खजिना कसा सुरक्षित ठेवायचा हे माहीत असते” आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.