Viral Photo Shows Woman Helps Local Sugarcane Vendor : कडक उन्हात उसाचा रस पिणे म्हणजे सुख आहे. घशाला सतत कोरड पडते, घामाने पूर्ण अंग भिजून जाते. पण, उसाच्या रसाचा एक घोट घेताच मन अगदी तृप्त होऊन जाते. त्यामुळे रसवंती केंद्र दिसलं की लगेचच आपण थांबून उसाचा रस हमखास पितो; तर उन्हाळ्यात उसाचा रस मिळणारी दुकाने इतरांना सहज मिळावी आणि छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना मदत मिळावी म्हणून एका महिलेने खास गोष्ट केली आहे.

व्हायरल पोस्ट बेंगळुरूच्या एका महिलेची आहे. पूनम या महिलेने बेंगळुरूच्या बनशंकरी येथील स्थानिक स्टॉलला भेट दिली आणि तेथे उसाचा रस प्यायली. स्टॉलला भेट देण्याचा तिचा अनुभव तिने शेअर केला आणि सांगितले की, हे दुकान लता नावाची महिला चालवते. तिने स्टॉल आणि आजूबाजूच्या परिसरात ठेवलेली स्वच्छता, मशीन किंवा स्टॉलच्या कोणत्याही काचेवर माश्या नव्हत्या, हे पाहून पूनमने एक खास गोष्ट करण्याचे ठरवले. नक्की तिने काय केले, व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा…

पोस्ट नक्की बघा…

व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिले असेल की, पूनमने महिलेच्या स्टॉलचा फोटो एक्स (ट्विटर)वर शेअर केला. तसेच स्टॉलवरील उपलब्ध असणाऱ्या मशीनचा फोटो शेअर करून लिहिले की, ती लहान हॉटेल्स आणि काही व्यक्तींसाठी इडली/डोसा पीठदेखील दळून देते. हे काम महिला दुपारी ४ वाजल्यापासून सुरू करते, तसेच ज्यूस शॉप आठवड्याचे ७ दिवस सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत चालू असते हेसुद्धा तिने सांगितले आहे. त्याचबरोबर तिने गूगल मॅप्सवर तिचा व्यवसाय सूचीबद्ध केला आणि तिच्या कामाचे नकळत कौतुक केले, जेणेकरून तेथे येणारे बरेच जण या स्टॉलला भेट देतील आणि भरउन्हात स्वच्छ जागी जाऊन उसाच्या रसाचे सेवन करतील.

तुम्ही सगळ्यात बेस्ट काम केलं आहे (Viral Photo)

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट @reader_wanderer या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच त्यांनी उसाचे छोटे छोटे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आहेत, हे पाहून अनेक नेटकरी कौतुक करत आहेत. ‘फ्रिजमध्ये उसाचे तुकडे तोडून ठेवलेत, वाह किती छान कल्पना आहे. मलासुद्धा त्यांना भेटायचं आहे’, ‘तिचा व्यवसाय गूगल मॅप्सवर जोडून तुम्ही सगळ्यात बेस्ट काम केलं आहे’, ‘खऱ्या आणि चांगल्या गोष्टींचा प्रचार केल्याबद्दल धन्यवाद… खूप कौतुकास्पद’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.