आपल्या देशात लाच देणारे आणि लाच घेणारे यांची कमी नाही. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटतील, जे त्यांचे काम करून घेण्यासाठी अगदी आरामात लाच देतात. त्यांच्या या कृत्याबद्दल अनेकजण फुशारकी मारताना दिसतात जणू त्यांनी खूप कौतुकास्पद काम केले आहे. सरकारच्या एवढ्या कडक कारवायांनंतरही काही लोक छुप्या पद्धतीने लाच घेताना देताना दिसतात.
मोठे लोक सोडाच पण हल्ली लहान मुलं,तरुण मुलंही हे गुन्हेगारी कृत्य करू लागली आहेत. आता तुम्ही म्हणाल लहान मुलं कुणाला लाच देणार आहेत. पण थांबा हा व्हायरल झालेला फोटो पाहून तुम्ही अवाक् व्हाल, कारण एका शाळकरी मुलानं त्याच्या उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येत नसल्यानं चक्क पैसे ठेवले आहेत.
“पेपर अवघड गेला सर, मला पास करा”
कोणत्या मुलाला बोर्डाच्या परीक्षेची भीती नसते. प्रत्येक मुलाला बोर्डाच्या परीक्षेची भीती वाटते. काही मुले त्यांची भीती कमी करण्यासाठी कठोर अभ्यास करतात. तर काही मुलं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच एका आयपीएस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत १००, २०० आणि ५०० च्या काही नोटा दिसत आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, या नोटा एका मुलाने बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत लाच म्हणून ठेवल्या होत्या, जेणेकरून शिक्षक लालसेपोटी त्याला पास करतील. “पेपर अवघड गेला सर, मला पास करा” असा मथळा लिहत या मुलानं काही पैसे उत्तर पत्रिकेत ठेवले.
पाहा फोटो
हेही वाचा – VIDEO: ‘सजना है मुझे सजना के लिए..’ ८० वर्षांच्या आजोबांचा या वयातील उत्साह पाहून नेटकरीही झाले अवाक्
हा फोटो आयपीएस अधिकारी अरुण बोथरा (@arunbothra) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. एका शिक्षकाने त्यांना हा फोटो पाठवल्याचे त्यांनी सांगितले. या नोटा विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत ठेवल्या होत्या जेणेकरून शिक्षक त्याला पास करतील. बोथरा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक व्यवस्था.’ मुलांनी शिक्षकाला लाच देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशी प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आली आहेत.