कुत्रा हा प्राणी हुशार आणि ईमानदार असतो याबद्दल शंका नाही. कुत्र्यांना नैसर्गिक आपत्तीबद्दलही माणसांआधीच समजतं असेही प्राणीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या अशाच एका स्मार्ट कुत्र्यावर नेटकरी फिदा झाले आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या टेक्सासमधील एका स्मार्ट कुत्र्याचा फोटो नेटवर खूप व्हायरल झालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेतील टेक्सास प्रांतामध्ये सध्या हॅर्वे चक्रीवादळाने थैमान घातले आहे, सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याबरोबर मालमत्तेचीही मोठ्या प्रमाणात  हानी झाली आहे. या परिस्थितीमुळे अनेकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. याच गोंधळात सिंटोन या लहान शहरातील ओटीस हा पाळीव कुत्रा टेक्सासवासीयांच्या जिद्दी वृत्तीचा प्रतिक बनला आहे. यामागील कारण म्हणजे हा कुत्रा खाण्याचं गाठोडं तोंडात पकडून रस्त्यावरून प्रवास करतानाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झालाय.

या फोटोबद्दल ‘शेरॉन डॉट कॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा हा सेलव्हाडोर सिंगोव्हीया या ६५ वर्षीय आजोबांच्या मालकीचा असून त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या नातवासाठी त्याला पाळले होते. मात्र पूर आल्याने आजोबांचा नातू त्याच्या आई-वडिलांसोबत दुसऱ्या शहरामध्ये निघून गेला. त्यानंतर सेलव्हाडोर यांच्या घरुन हा ओटीस कुत्राही गायब झाला. मी त्याला भरपूर शोधले. त्याच्या नावाने अनेक तास हाका मारल्या मात्र तो कुठेच नव्हता. शेवटी मला त्यांचे खायचे गाठोडेही घरात नसल्याचे लक्षात आले असे सेलव्हाडोर यांनी शेरॉन डॉट कॉमशी बोलताना सांगितले. मग सेलव्हाडोर या कुत्र्याला शोधण्यासाठी आपल्या गाडीतून शहरातील रस्त्यांवर भटकू लागले.

दुसरीकडे त्याच शहरातील तेईली डॉकिन्स या तरुणीने रस्त्यावरून खाण्याचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या या कुत्र्याचा फोटो काढून तो फेसबुकवर अपलोड केला. तिथे हा फोटो काही तासांमध्ये २२ हजारहून जास्त जणांनी शेअर केला आहे. या फोटोमुळे ओटीस त्याच्या मालकाला पुन्हा सापडला. ६ हजारांची लोकसंख्या असणाऱ्या सिंटोन शहरामध्ये ओटीस आधीच लोकप्रिय होता आणि आता या तर तो आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीच झाला आहे.