आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि सोशल मीडिया प्रेमाशी संबंधित गोष्टींनी भरले आहे. ब्रिटीश रिटेलर २४७ ब्लाइंड्स व्हॅलेंटाइन थीम असलेलं एक भन्नाट कोडं घेऊन आले आहे. हे कोडं चांगलचं व्हायरल झालं आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये हृदयाच्या आकाराचा (हार्ट शेप) फुगा शोधायचा आहे. हे कोडं सोडवायला तुम्हाला खूप मजा येईल.
व्हॅलेंटाइन-थीम असलेल्या चित्राच्या मध्यभागी हृदयाच्या आकाराचा फुगा शोधण्याचे आव्हान स्वीकारताना नेटीझन्सला मज्जा येत आहे. फोटोमध्ये गुलाबी पार्श्वभूमी असून त्याच्या सभोवताली अनेक धनुष्य, हृदय आणि गुलाब आहेत. २४७ ब्लाइंड्स १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेपूर्वी हा फोटो शेअर केला आहे.
(हे ही वाचा: Happy Chocolate Day 2022: व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या ‘चॉकलेट डे’चा रंजक इतिहास माहितेय का?)
तुम्ही सोडवू शकता का हे कोडं?
थोडं अवघड आहे पण खूप मजा आली का? तथापि, जर तुम्हाला हृदयाच्या आकाराचा फुगा सापडत नसेल खाली दिलेला फोटो बघा तुम्हाला उत्तर नक्की सापडेलं.
ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो.