सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेले असंख्य फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये तुम्हाला पूर्णपणे अडकवून ठेवण्याची क्षमता आहे. हॅरी पॉटरचे प्रसिद्ध लेखक जेके रोलिंग यांनीही एक ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो शेअर केला आहे, ज्याला बघून नेटीझन्स थक्क झाले आहेत. तो फोटो घोड्याचा इल्यूजन असलेला फोटो आहे जो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोकडे बघून आणि त्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला बघून ज्याने इंटरनेट वापरकर्त्यांना आश्चर्यचकित विचारात पडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घोडा कोणत्या दिशेने चालला आहे?

मूळतः व्हायरल ऑप्टिकल इल्युजन यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आणि नेटिझन्सना घोडा कोणत्या दिशेने चालला आहे हे विचारले गेले. व्हिडीओमध्ये घोडा दिशा बदलताना दिसत आहे. घोडा घड्याळाच्या दिशेने चालतो की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने? हे कोणालाच समजत नाहीये. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हा घोडा कोणत्या दिशेने फिरत आहे? डाव्या किंवा उजव्या बाजूला?’

(हे ही वाचा: Viral: ‘हा’ चिमुकला चक्क विशालकाय अजगरावर बसून करतोय मज्जा! video बघून नेटीझन्सही झाले हैराण)

(हे ही वाचा: Viral Photo: ऑप्टिकल इल्युजन असलेल्या ‘या’ फोटोत तुम्हाला काय दिसत आहे?)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

ऑप्टिकल इल्युजनसह व्हिडीओ पाहिल्यानंतर, वापरकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले की, ‘पायाकडे पाहा आणि तुम्हाला उत्तर मिळेल, तो कोणत्या मार्गाने जात आहे.’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘हे घड्याळानुसार फिरत आहे. ते शोधण्यासाठी त्याचे अंधुक दृष्टिने बघा. त्यावरील बिंदूंमुळे ते दोन्ही दिशेने फिरत असल्याचा भास होतो.’ खरतर, हा घोडा १८० अंश उजवीकडे व नंतर १८० अंश डावीकडे फिरत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. घोड्यावरील ठिपके लोकांना गोंधळात टाकत आहे. तुम्हाला काय वाटत? काय आहे योग्य उत्तर?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral photo which way is the horse moving can you give the correct answer ttg