टीम इंडिया सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे, हा सामना विराटच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना आहे आणि प्रत्येकजण या सामन्यात कोहलीच्या शतकाची वाट पाहत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट अनेक दिवसांपासून आपल्या बॅटने १०० धावांचा टप्पा पार करू शकला नाही, त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. दरम्यान, भारत-श्रीलंका मॅचदरम्यान एक असा फोटो समोर आला आहे, ज्याने सगळ्यांनाच हसू आलं आणि आता हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोहलीचे शतक आणि चाहत्याचे लग्न

४ मार्च हा विराट कोहलीसाठी सर्वात खास दिवस ठरला आहे, या तारखेला विराटने त्याच्या १००व्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरले. यासोबतच भारताच्या पहिल्या डावात १०० व्या कसोटी सामन्यात विराटकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा होती, मात्र तो केवळ ४५ धावा करून बाद झाला. ज्यानंतर चाहत्यांची प्रतीक्षा ही निव्वळ प्रतीक्षा ठरली आहे, पण विराटचा एक चाहता आहे ज्याने आपल्या शतकासाठी आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट थांबवली आहे.

(हे ही वाचा: Video: श्रीवल्ली गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स viral; नेटीझन्स म्हणतात ‘सगळ्यात गोड पुष्पा हाच’)

भारत-श्रीलंका कसोटी सामन्यादरम्यान खास पोस्टरसोबत एक चाहता दिसला. या चाहत्याने पोस्टरवर एक मजेदार गोष्ट लिहिली होती. त्याने पोस्टरवर लिहिले होते- विराटने ७१ वे शतक पूर्ण करेपर्यंत मी लग्न करणार नाही. आता या पोस्टरचा फोटो खूप व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपला आहे एक फोन; तुम्ही शोधू शकता का?)

(हे ही वाचा: महाकाय अजगराचा रस्ता ओलांडतानाचा Video Viral; नेटीझन्स म्हणतात असे दृश्य कधीच पहिले नाही)

शेवटचे शतक कधी मारले होते?

एक काळ असा होता की, विराट सर्व विक्रम आपल्या नावावर करेल. पण २०१९ सालापासून त्याची बॅट शांत झाली आणि त्याच्या बॅटने शतक झळकावताना चाहत्यांना आसुसले. २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटीत विराटने शेवटचे शतक झळकावले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral photo will not get married till then big decision taken by fans for virat ttg