बस, रिक्षा, ट्रेन आदी वाहनांमधून प्रवास करणे आणि पहिल्यांदा विमानातून प्रवास करण्याचा अनुभव खुप वेगळा असतो. विमानातून प्रवास करणारे प्रवासी थोडे उत्साही तर थोडे चिंताग्रस्त असतात. कारण काही जणांना विमान प्रवासाचे तिकीट काढण्यापासून ते बोर्डिंग करेपर्यंत व विमानातील सोईसुविधा बद्दल बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. एका प्रवाशाने देसी जुगाड करून विमानातील एका वस्तूचा आय मास्क बनवला आहे ; जे पाहून तुम्ही पोट धरून हसाल.
युजरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती विमानात शांतपणे झोपलेली दिसते आहे. तसेच झोपण्यासाठी या व्यक्तीने आय मास्क नाही. तर इंडिगो लोगोचा हेडरेस्ट कव्हर चेहऱ्यावर लावला आहे. हा हेडरेस्ट कव्हर प्रवाशांना आराम करण्यासाठी सीटवर लावला जातो. पण, या व्यक्तीने जुगाड करून हा चेहऱ्यावर लावला आहे शांत झोपी गेला आहे. तुम्हीसुद्धा पाहा ही मजेशीर पोस्ट.
हेही वाचा…७५ शेफनी बनविला जगातील सर्वांत मोठा डोसा! १०० वेळा ठरले अयशस्वी; पण…. पाहा VIDEO
पोस्ट नक्की बघा…
तुम्ही पोस्टमध्ये पाहिलं असेल की, विमानात प्रवासी ज्या सीटवर बसतात त्या सर्व प्रवाशांच्या प्रत्येक सीटवर एक हेडरेस्ट कव्हर लावला आहे. पण, व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यक्तीने हा हेडरेस्ट कव्हर स्वतःच्या चेहऱ्यावर लावून घेतला आहे. तसेच मजेशीर गोष्ट अशी की, हेडरेस्ट कव्हर चेहऱ्यावरून लावून त्यांनी त्याच्यावर चष्मा सुद्धा लावला आहे ; जे बघायला खूपच मजेशीर वाटते आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @outofofficedaku या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. तसेच “इंडिगो आता त्यांच्या सर्व प्रवाशांसाठी मोफत आय मास्क प्रदान करते आहे ” ; अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी मजेशीर कमेंट करताना दिसून आले आहेत. तसेच एका युजरने कमेंट केली आहे की, ‘कोणाला बॅक रेस्ट कव्हर आय शील्ड म्हणून वापरायचे असल्यास इंडिगो १०० रुपये आकारेल’. एकूणच सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.