सध्या सोशल मिडियावर पाच लहान मुलांचा फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमधील मुले स्लिपर हातात घेऊन सेल्फीची पोज देताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटीजनेही हा फोटो सोशल नेटवर्किंगवर ट्विट केला आहे. अमिताभ बच्चन यांनी तर मला हा फोटो फोटोशॉप केलेला वाटतो अशी कमेन्टही केली आहे.

सोशल मिडियावर अनेकजण रातोरात स्टार होऊन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतात. तर अनेकदा भावनिक फोटो व्हायरल होतात. सध्या असाच एक फोटो सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमधील पाच लहान मुले स्लिपर हातात घेऊन सेल्फीची पोज देताना दिसत आहेत. खरं तर हा फोटो कोणी काढला आणि कसा व्हायरल झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सर्वच जण या फोटोच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे. बोमन इराणी यांनी इन्स्टाग्रामवरुन हा फोटो शेअर करताना, ‘किती आनंदी राहयचं हे तुम्हीच ठरवू शकता. हे सत्य सर्वांसाठीच आहे. या सेल्फीला सर्वाधिक लाइक्स मिळायला हवेत.’ असं मत बोमन इराणी यांनी या फोटोबरोबरच्या डिस्क्रीप्शनमध्ये व्यक्त केले आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्धी निर्माते सिद्धार्थ बासू यांनाही हा फोटो सोशल नेटवरर्किंगवरुन शेअर केला असून कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ‘हे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून मला माझ्या चेहऱ्यावरील हसू लपवता येत नाहीय.’

एकीकडे या फोटोची स्तुती केली जात असतानाच काहीजणांनी हा फोटो फोटोशॉप केला आहे किंवा ठरवून काढण्यात आला आहे अशी शंका उपस्थित केली आहे. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी शेअर केलेल्या या फोटोवर ट्विटवरुन कमेन्ट करुन आमिताभ यांनी आपले मत नोंदवले आहे.

अतुल यांच्या फोटोवर कमेन्ट करताना अमिताभ लिहितात, ‘पूर्ण सन्मान ठेऊन आधीच माफी मागून मत मांडतोय.. मला वाटतं हा फोटो फोटोशॉप केलेला आहे. या फोटोमध्ये ज्या हाताने मुलाने चप्पल धरली आहे तो हात त्याच्या अंगाच्या आकाराच्या तुलनेत मोठा वाटतोय. अगदी त्याच्या दुसऱ्या हातापेक्षाही तो मोठा वाटतोय.’

अमिताभ यांच्या या शंकेवर अतुल यांनी कमेन्ट करुन स्पष्टिकरण दिले. ‘तीन जणांकडून हा फोटो तपासून पाहिला आहे सर. तिघांनीही हा फोटो फोटोशॉप केलेला नसल्याचे सांगितले आहे. ज्या हाताने चप्पल पकडली आहे तो मोठा वाटण्यामागे स्मार्टफोनचे परस्पेक्टीव्ह डिस्टॉर्शन कारणीभूत आहे.’ असं अतुल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान इतर अनेकांनाही या फोटोमधून निरागसता दिसून येते असं सांगत तो सोशल नेटर्किंगवर शेअर केला आहे.

मला इतकं आनंदी रहायला आवडेल

तेव्हा सेल्फी काढा

आनंद म्हणजे मनाला काय वाटते

आता या फोटोमागील सत्य समोर येईल तेव्हा येईल पण खरोखरच हा निरागस फोटोची नेटकऱ्यांना भूरळ पडली आहे हे मात्र खरं आहे.

Story img Loader