कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस असेल तर आपण केक कापतो. हा केक आता झोमॅटो, स्विगी या ॲपवर सुद्धा ऑनलाईन आपण ऑर्डर करू शकतो. तसेच केकवर नाव किंवा एखादा संदेश लिहिण्यासाठी तिथे बॉक्स दिलेला असतो. पण, या बॉक्समध्ये काही मर्यादित अक्षरे (लेटर्स) लिहिली जाऊ शकतात. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. झोमॅटोच्या संदेश लिहिल्या जाणाऱ्या बॉक्समध्ये अर्धचं वाक्य लिहिल्यामुळे वाढदिवसाचे सरप्राईज फसते.

तरुणाची मैत्रीण ईशा हीचा वाढदिवस असतो. तसेच तिच्या वाढदिवसासाठी तरुणाला खास सरप्राईज द्यायचे असते. म्हणून तो तिच्यासाठी केक ऑर्डर करतो. केक ऑर्डर करताना तो झोमॅटोच्या बॉक्समध्ये लिहितो की, एक मेणबत्ती पाठवा आणि हॅप्पी बर्थडे ईशा लिहा किंवा हॅप्पी बर्थडेचं स्टिकर लावून जमल्यास ईशा लिहा. पण, एवढा संदेश टाइप करताच त्या बॉक्सची अक्षरांची लिमिट संपते आणि झोमॅटोला अपूर्ण मेसेज पोहचतो. हे पाहिल्यावर झोमॅटो कंपनी या केकवर काय लिहून पाठवते एकदा तुम्ही सुद्धा बघा.

uncle dance so gracefully
काकांनी केला अप्रतिम डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO होतोय व्हायरल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
two friends chickens joke
हास्यतरंग :  खांद्यावर…
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Success Story Of Sanam Kapoor
Success Story Of Sanam Kapoor : ‘आयटी’तील नोकरी सोडून सुरू केला पिझ्झा ब्रॅण्ड; वाचा लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणाऱ्या सनम कपूरचा प्रवास
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर

हेही वाचा…तुम्हालाही स्टाईलिश फ्लिप फ्लॉप घालण्याची आहे आवड ? मग कारखान्याचा व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO पाहा

पोस्ट नक्की बघा :

तरुण केकवर नाव लिहिण्यासाठी झोमॅटोला दोन पर्याय देतो. एक ‘मेणबत्ती पाठवा आणि हॅप्पी बर्थडे ईशा लिहा’ किंवा ‘हॅप्पी बर्थडेच स्टिकर लावून ईशा’ इफ पॉसिब’ लिहा. म्हणजेच तरुणाला म्हणायचे असते की, जागा असल्यास किंवा शक्य झाल्यास ईशा लिहा. पण, पॉसिबल (शक्य असल्यास ) हा शब्द अर्धाच लिहिला जातो आणि झोमॅटो केकवर ‘ईशा पॉसिब’ असे लिहून पाठवतो. दोन पर्याय दिल्यामुळे झोमॅटोचे सहकारी गोंधळतात आणि दुसरा पर्याय केकवर लिहिण्यासाठी निवडतात .

सोशल मीडियावर तरुणाने केक ऑर्डर करताना एक स्क्रिन शॉट आणि घरी आलेल्या केकचा एक फोटो @Gaurav1005 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आणि ‘हाय झोमॅटो, कृपया शब्द मर्यादा वाढवा’ अशी कॅप्शन लिहिली आहे. तसेच ही पोस्ट पाहून झोमॅटोच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @zomato अकाउंटवरून ही पोस्ट रिपोस्ट करून ‘शक्य असल्यास मी टेक (तंत्रज्ञान) टीमशी बोलून घेईन’ अशी मजेशीर कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे. ही पोस्ट पाहून अनेक नेटकरी पोट धरून हसताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.