Swiggy Instamart : किराणा माल घरपोच करणाऱ्या स्विगी इन्स्टामार्ट या ऑनलाइन डिलिव्हरी सेवा ॲपवर ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स येत असतात. तसेच स्विगी ही कंपनीसुद्धा त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन वस्तूंवर खास सूट किंवा डिस्काउंट देत असते. सध्या स्विगी इन्स्टामार्ट कंपनीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी अगदी मजेशीररीत्या एका ग्राहकाची इच्छा पूर्ण केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्स (ट्विटर)वर स्विगी इन्स्टामार्टने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात ग्राहकांसाठी खास संदेश लिहिण्यात आला, “या वर्षी तुमच्या बकेट लिस्टपैकी तुम्हाला खरेदी करता नाही आली अशी एखादी गोष्ट असेल, तर ती आम्हाला सांगा. आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.” स्विगीच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आणि अनेक ग्राहकांनी त्यांच्या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

हेही वाचा…मुबंईकरांनो सावधान! बसने प्रवास करत असाल तर पोलिसांचा ‘हा’ VIDEO एकदा नक्की बघा…

पोस्ट नक्की बघा :

तसेच सर्व ग्राहकांच्या कमेंट्समधून स्विगी इन्स्टामार्ट टीमने एका ग्राहकाला निवडले; ज्याची इच्छा खूपच अनोखी होती. तर @KanjarKalesh म्हणून ओळखला जाणारा हिमांशू बन्सल याने इच्छा व्यक्त केली की, मला या वर्षी खरोखरच हॉट (छान) दिसायचं होतं. मग या युजरची ही अनोखी इच्छा पाहून स्विगी इन्स्टामार्टने त्याची इच्छा अगदीच अनोख्या स्टाईलमध्ये पूर्ण केली.

स्विगी इन्स्टामार्टचा एक डिलिव्हरी बॉय तरुणाच्या घराबाहेर उभा राहिला. जेव्हा तरुण घराबाहेर येतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण- त्या तरुणासाठी डिलिव्हरी बॉयने खास बॅण्ड आणि एक हिटर अशा भेटवस्तू म्हणून आणल्या होत्या. तरुणाच्या गळ्यात हार घालत डिलिव्हरी बॉयने तरुणाची बकेट लिस्टमधील त्याची इच्छा अनोख्या पद्धतीने पूर्ण केली. तसेच या मजेशीर क्षणाचा एक व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शन लिहिले, तुमच्यासाठी हीटर आहे; जेणेकरून तुम्ही नेहमीच गरम (हॉट) राहाल. सोशल मीडियावर ही पोस्ट आणि हा व्हिडीओ स्विगी इन्स्टामार्ट यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @SwiggyInstamart या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral post of swiggy instamart fulfils x customer wish in funny way with hilarious twist asp