रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. रोहित पवार नेहमीच त्यांच्या मतदारसंघातील लोकांना मदत करतना दिसतात. तसेच, रोहित पवार सोशल मीडियावरही चांगलेचं सक्रीय असतात. ते त्यांच्या कामाबद्दल, मतदारसंघातील लोकांबद्दल, आणि अन्य अनेक गोष्टींबद्दलची माहिती सोशल मीडियावरून सगळ्यांपर्यंत पोहचवत असतात. अशीच त्यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे ज्या मुळे रोहित पवारांचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे.
सांगलीमध्ये ऊसतोडीला गेले असताना दुचाकी अपघातात रोहित पवारांच्या मतदारसंघातील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्यांच्या मेंदूलाही जबर मार लागला होता. या वेळी त्या मुलाच्या उपचारासाठी रोहित पवारांनी मदत केली. म्हणूनच त्या मुलाच्या वडिलांनी हरिदास फुंदे यांनी आग्रह करून त्यांना घरी बोलावलं. याच संर्दभातील पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
“घरी गेल्यानंतर अनपेक्षितपणे माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना नेहमीच मदत करत असतो पण काल अचानक झालेल्या या अनोख्या स्वागताने भारावून गेलो आणि लोकांसाठी अधिक जोमाने काम करण्यास बळ मिळालं. विशेष म्हणजे प्रविण आता बरा झाला असून त्याला भेटून खूप आनंद वाटला.” असं पोस्ट मध्ये रोहित पवारांनी लिहाल आहे.
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
रोहित पवारांच्या या पोस्टला आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाइक केलं आहे. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एक युजर म्हणतो की, “हेच काम दादा आपणास वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहेत, अशीच गोरगरीब जनतेस मदत करीत रहा.” तर, दुसरा युजर कमेंट करतो की, “उत्तम काम दादा …असेच सकाजकार्य आपल्या हातुन घडो ह्याच सदिच्छा”. कमेंट बॉक्समध्ये रोहित पवारांच्या कामच कौतुक करत कमेंट्स करताना दिसत आहे.