Viral Post Shows Coconut Seller Best Advice : सकाळी उठायचे, अंघोळ करायची आणि नाश्ता करून थेट ऑफिसमध्ये पोहोचायचे. ९ ते ५ किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करून पुन्हा घरी यायचे. दुसऱ्या दिवशी हेच चक्र पुन्हा सुरू… यामध्ये काही जण खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देतात. पण, काही जण फक्त काम, काम एवढेच करत असतात आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर आज याचसंबंधित एक पोस्ट व्हायरल होते आहे. उबर कॅबमुळे घाई करायला सांगितल्यावर एका नारळ विक्रेत्याकडून मुंबईच्या महिलेला एक मोलाचा संदेश मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्स युजर गार्गीने उबर बुक केली होती. उबर येईपर्यंत ती नारळ विक्रेत्याकडून नारळ घ्यायला गेली. यादरम्यान उबर अर्ध्या रस्त्यात आल्यामुळे ती विक्रेत्याला नारळ फटाफट तोडा, असे सहज म्हणाली. तितक्यात विक्रेता सहज महिलेकडे बघून म्हणाला, “तुम्ही इतके पैसे का कमावता? काम चालू राहील; पण खाण्यापिण्याला वेळ दिला पाहिजे” हे ऐकून महिला भारावून गेली आणि तिने विक्रेत्याकडून घेतलेल्या नारळाचा एक फोटो (Post) शेअर केला आणि हा खास सल्ला पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिला.


पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर ही पोस्ट (Post) @archivesbygargi या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच कॅप्शनमध्ये तिने दोघांमधील संवाद लिहिला आहे. तर पोस्ट पाहून नेटकरी कमेंट्स सेक्शनमध्ये त्यांचे अनुभव शेअर करताना या क्षणाचे वेगवेगळ्या शब्दांत कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “मी संध्याकाळी कामावरून घरी जाताना रिक्षामध्ये माझा डबा खात होते आणि हे पाहून रिक्षाचालक म्हणाला की, काम वगैरे सोडा; आपण राहिलो, तरच काम राहील.”

५० रुपयांच्या नाराळाबरोबर १० लाखांचा सल्ला

तर दुसरा युजर म्हणतोय, “५० रुपयांच्या नारळाबरोबर १० लाखांचा सल्ला मिळाला” आदी सकारात्मक कमेंट्स आणि याउलट उबर ड्रायव्हरने निश्चितपणे २ ते ३ मिनिटे वाट पाहिली असती. त्यामुळे प्रत्यक्षात कोणतीही घाई नव्हती., आई-बाबा सांगतात ते नाही पटत; विक्रेत्याचे म्हणणे पटले, नारळविक्रेत्याला कोण सांगेल की, एवढी रक्कम पुरेशी नाही. यापेक्षा जास्त पैसे कमावणाऱ्यांनाच ऐषाराम परवडतो आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहे.