Viral Post Shows Rajasthan’s Prem Chand Bairwa has been removed from deputy CM post : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होणारी एक पोस्ट सापडली. राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्या अनैतिक वर्तनाच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्या अडचणीत तेव्हा वाढ झाली, जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी ३ ऑक्टोबर रोजी एक्स (ट्विटर) वर पोस्ट लिहिली. कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नसला तरी या पोस्टवर (Viral Post ) भाजपाने स्पष्टीकरण देऊन बैरवांची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नाचा निषेध केला, तर नक्की खरं काय खोटं काय बातमीतून सविस्तर जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

युजरआयपी सिंगने त्याच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून व्हायरल इ-पेपरचा फोटो (Viral Post ) शेअर केला आहे.

पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा…

https://web.archive.org/web/20241004062158/https://twitter.com/IPSinghSp/status/1842087751015137548

इतर युजर्सदेखील हाच दावा करत पोस्ट शेअर (Viral Post) करत आहेत.

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘प्रिय बाबा… ‘ वाढदिवसासाठी लेकीने बनवलं हँडमेड गिफ्ट; क्रिएटिव्हिटी पाहून वाजवाल टाळ्या

तपास:

या हिंदी वर्तमानपत्राचे शीर्षक होते : प्रेमचंद बरवा को रशियन महिला के साथ हॉटेल में दिल्ली पुलिस ने पकड लिया, भाजपाने उपमुख्यमंत्री पद से हटा दिया… म्हणजेच, दिल्ली पोलिसांनी प्रेमचंद बैरवा यांना हॉटेलमध्ये रशियन महिलेबरोबर पकडले, भाजपाने त्यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले.

आम्ही गूगल कीवर्ड शोध घेतला आणि आम्हाला STAR TV NEWS 24 वर ही बातमी सापडली.

https://startvnews4.in/2024/10/premchand-bairva-ko-rshiyn-mhila-ke-sath-hotl-men-dillee-pulis-ne-pkada-bhaajpa-ne-upmukhymantree-pd-se-htaya/

चार दिवसांपूर्वी ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती आणि भरतपूरमधील पंकज सिंह नावाच्या एका पत्रकाराच्या नावाखाली अहवाल दाखल करण्यात आला होता. तथापि, व्हायरल इपेपर क्लिपमध्ये नाव असलेल्या पत्रकाराचे नाव डॉक्टर भैरावसिंग होते.

वेबसाइटचे आर्काइव्ह व्हर्जन बघा: https://web.archive.org/web/20241008064853/https://startvnews4.in/2024/10/premchand-bairva-ko-rshiyn-mhila-ke-sath-hotl-men- दिली-पुलिस-ने-पकडा-भाजपा-ने-उपमुख्यमंत्री-पीडी-से-हटया/

वेबसाइटच्या युआरएल (URL) च्या विश्लेषणाद्वारे आम्हाला असे आढळले की, वेबसाइटचे डोमेन फक्त २४ दिवसांपूर्वी नोंदणीकृत करण्यात आले होते. पण, आम्हाला इतर कोणत्याही मीडिया वेबसाइटवर बातम्या आढळल्या नाहीत.

आम्हाला प्रेमचंद बैरवा यांच्याबद्दल अनेक बातम्या आढळल्या, पण ते पायउतार झाल्याचे किंवा उपमुख्यमंत्रिपदावरून हटल्याचे वृत्त नाही.

https://indianexpress.com/article/political-pulse/rajasthan-deputy-cm-prem-chand-bairwa-finds-himself-on-slippery-ground-9608647/

https://www.freepressjournal.in/india/after-reports-of-rajasthan-deputy-cm-being-detained-with-russian-woman-from-delhi-hotel-bjp-rushes-to-denounce-character-

त्यानंतर आम्ही राजस्थानमधील ज्येष्ठ पत्रकार आनंद त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल झालेली पेपर क्लिप खोटी असून प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

निष्कर्ष : तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, राजस्थानचे प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आलेले नाही आणि व्हायरल व्हायरल झालेल्या इ-पेपरचा फोटो (Viral Post) बनावट आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral post shows newspaper cutting stating rajasthan prem chand bairwa has been removed from deputy cm post is false read fact check asp