Viral Photo Shows Person Give Bus Seat To An Elderly Man : एसटी, शहर बससेवा (एएमटी), रेल्वे व अन्य ठिकाणी अपंग, वृद्ध, पुरुष आणि महिलांसाठी जागा आरक्षित असतात. अनेकदा आरक्षित केलेल्या काही जागांवर बसणारी व्यक्ती बसमध्ये चढली नसेल की आपण सगळेच त्या ठिकाणी जाऊन हक्काने बसतो. मग पुढच्या स्टॉपवर एखादी अपंग व वृद्ध व्यक्ती चढली की आपल्याला त्यांच्या जागेवरून उठून त्यांना बसायला द्यावे लागते किंवा काही जण आपली हक्काची जागासुद्धा इतरांना बसायला देतात. काही ठिकाणी या मुद्द्यावरून वादसुद्धा होतात. पण, आज एका व्यक्तीबरोबर एक गोष्ट घडली, जी ऐकून तुम्हीही नक्कीच विचारात पडाल एवढं तर नक्की…

@Reddit युजर @moamen12323 ने तिच्या बस प्रवासाचा एक अनुभव शेअर केला. ती व्यक्ती कामावरून घरी जात होती. प्रचंड थकलेल्या या व्यक्तीला काहीही करण्याची इच्छा नव्हती. यासगळ्यात ती गर्दी असलेल्या बसमध्ये चढली. एक रिकामी सीट दिसताच तेथे जाऊन बसली. थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस त्या बसमध्ये चढतो, जो खूप थकलेला दिसत होता आणि बराच वेळ तो उभा आहे असेही जाणवत होतं. मग कोणताही विचार न करता त्या व्यक्तीने स्वतःची सीट त्या वयस्कर माणसाला बसायला दिली.

पोस्ट नक्की बघा

I Gave Up My Seat to an Elderly Man on the Bus ,What He Said to Me Afterwards Made Me Think a Lot.
byu/moamen12323 inself

एकटेपणा, करुणा आणि मानवी नात्याचे महत्त्व… (Viral Post)

वयस्कर माणसाने स्मितहास्याने त्या व्यक्तीचे आभार मानले आणि थोड्या वेळाने तो तिच्याशी बोलू लागला. त्याने अज्ञात व्यक्तीला कामाबद्दल आणि आयुष्य कसे चालले आहे याबद्दल विचारले. आमचे बोलणे चालू असताना अचानक वयस्कर माणूस म्हणाला, ‘मी चार दिवसांपासून कोणाशीही बोललो नाही, मला फक्त माझे ऐकण्यासाठी कोणीतरी हवे होते.’ हे ऐकताच अज्ञात व्यक्ती काहीच उत्तर देऊ शकली नाही. पण, वयस्कर माणूस निघून जाईपर्यंत अज्ञात व्यक्ती शांतपणे बसून त्याचे सगळे बोलणे ऐकत होती.

आपल्या मदतीचा हात एखाद्याचा दिवस किती खास करू शकतो हे अज्ञात व्यक्तीला तेव्हा जाणवले आणि त्याने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवले. त्याने संपूर्ण अनुभव @Reddit वर @moamen12323 या अकाउंटवरून शेअर केला आणि ‘मी बसमध्ये एका वृद्ध माणसाला माझी सीट दिली आणि नंतर त्याने मला जे सांगितले ते ऐकून मी खूप विचार करायला लागलो’, अशी कॅप्शन पोस्टला दिली आहे. नेटकऱ्यांनी ही पोस्ट पाहून एकटेपणा, करुणा आणि मानवी नात्याचे महत्त्व यावर आपापले विचार मांडले आहेत.