पुणे आणि पुणेकरांची चर्चा जगभरात होत असते. पुणेकरांच्य पुणेरी शैलीबरोबरोच पुण्यात संस्कृती आहे, ऐतिहासिक वारसा आहे, कला आणि शिक्षणाचा वारसा आहे, अप्रतिम खाद्य संस्कृती आहे आणि पुणेरी शैली देखील आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं ते उगाच नाही.! अशी कुठलीही गोष्ट नाही जी पुण्यात सापडणार नाही. आता हेच बघा ना…सध्या पुण्यातील एक अफलातून रिक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. जगात कुठेही पाहायला मिळणार नाही अशी रिक्षा आपल्याला पुण्यात पाहायला मिळते आहे. तुम्हाला वाटेल रिक्षातर सर्वत्र असतात मग त्यात काय विशेष? तीच तर गंमत आहे. ही रिक्षा काही साधी रिक्षा नाही. या रिक्षामध्ये अशा खास गोष्टी आहे ज्या तुम्ही कधीही कुठेही पाहिल्या नसतील.

पुणेरी रिक्षाचालकांचा अनोखा जुगाड

पुण्यात जितकी चर्चा पुणेरी पाट्यांची होते तितकीच चर्चा पुण्यातील रिक्षाचालकांची देखील होती त्यामुळे कोणीही पुण्यातील रिक्षाचालकांच्या नादी लागत नाही. पुण्यातील रिक्षाचालक भाडे नाकारणे किंवा प्रवाशांना पुणेरी शैलीत उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण कधी पुण्यातील रिक्षाचालकांच्या रिक्षावर पुणेरी शैलीत खास संदेश लिहिलेला असतो तर कधी त्यांची रिक्षाच हटके असते. काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्याने आपल्या रिक्षामध्ये रोप असलेल्या कुंड्या ठेवल्या होत्या. आता अशाच प्रकारे एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षामध्ये चक्क मत्सालय लावले आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Viral Rickshaw Hording Photo |
“देवानंतर पत्नीच…” रिक्षामागे पठ्ठ्याने लिहिलं असं काही की VIDEO पाहून युजर म्हणाले, “भावाने अनुभव…”

पुणेरी रिक्षाचालकाने रिक्षात बनवले मत्सालय

व्हायरल व्हिडीओमध्ये एका पुण्यातील रिक्षाचालकाने आपल्या रिक्षा सुंदर पद्धतीने सजवली आहे. रिक्षामध्ये मत्सालय बसवले आहे. काचेच्या पेटीतील पाण्यात रंगीबेरंगी मासे पोहताना दिसत आहे. तसेच संपूर्ण रिक्षामध्ये निळ्यारंगाची लाइटिंग केली आहे. रिक्षाच्या मागच्या बाजू पारदर्शी काच बसवली आहे ज्यामुळे बाहेरून रिक्षाच्या आतील दृश्य दिसत आहे. ही रिक्षा रस्त्यावरून धावत आहे. मागून येणाऱ्या एका व्यक्तीने रिक्षाचा व्हिडिओ शुट केला आहे. ज्याक्षणी रिक्षाचालक व्हिडिओ शुट करणाऱ्याकडे पाहतो त्याच्या चेहऱ्यावर आनंदाने एक स्मितहास्य उमटते.

हेही वाचा – “अरे आम्ही जळगावची पोरं…” तरुणाचा रॅप चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल

पुण्यातील हा हटके रिक्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंस्टाग्रामवर pune_captures नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पुणेकरांचा नाद नाही”

हेही वाचा – “इथे शिक्षणावर प्रेम केलं जातं…” जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नाचत नाचत गायलं पावसाचं गाणं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक

नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

व्हिडीओवर कमेंट करून अनेकांनी रिक्षाचालकाचे तोंडभरून कौतुक केले आहे. एकाने लिहिले की, “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे. ते त्या दादाच्या चेहऱ्यावरच्या हास्य पाहून समजले.”

दुसऱ्याने लिहिले, “फार सुंदर, प्रत्येकाची आपली हौस असते, आपली आवड असते”

तिसऱ्याने लिहिले की, “व्वा! मस्त किती हौशी असतात. छान”

चौथ्याने लिहिले, “हे काहीतरी वेगळे आणि सर्जनशील होते”