Viral Robbery Video : लाइटहाऊस जर्नालिझला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिवसाढवळ्या दोन दरोडेखोर धार-धार शस्त्राच्या मदतीने दुकानांची तोडफोड करत असल्याचा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात शेअर केला जात असल्याचे आढळून आले. या व्हिडिओमध्ये यानंतर लष्कराचे जवान त्या दरोडेखोरांना पकडताना दिसत आहेत. या व्हिडिओबरोबर असा दावा केला जात होता की, ही घटना भारतात घडली असून भारतीय लष्कराचे जवान दरोडेखोरांना पकडताना दिसत आहेत.पण खरंच भारतातील कोणत्या राज्यात भरदिवसा अशी थरारक दरोड्याची घटना घडली का? यामागचं सत्य जाणून घेऊ..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Khushbu_journo ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह विडिओ शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील समान दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
व्हिडिओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आम्ही आमचा तपास सुरू केला.
आम्हाला फेसबुकवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.
कॅप्शन मध्ये म्हंटले होते की(अनुवाद): फरीदपूरमधील व्यावसायिकांच्या दुकानांची तोडफोड, त्यादरम्यान लष्कराच्या जवानांनी दरोडेखोरांना जेरबंद केले.
आम्हाला फ्रेंड्स टीव्ही या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे (अनुवाद): फरीदपूरमध्ये व्यावसायिक दुकानांवर धार-धार शस्त्रांनी हल्ले केले जात आहेत.सैन्य आल्यानंतर काय झाले —
आम्हाला चॅनल 24 वर अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला.
कॅप्शन म्हटले (अनुवाद): दुकानांची तोडफोड आणि लुटमार करताना लष्कराने दरोडेखोरांना पकडले, फरीदपूर बातम्या | बांगलादेश लष्कर | चॅनल 24
Rtv वर अपलोड केलेल्या बातमीत आम्हाला या व्हिडिओमधील किफ्रेम देखील सापडली.
लेखाचे शीर्षक होते: दुकानाची तोडफोड करताना दरोडेखोरांना लष्कराने पकडले, दोघांची ओळख पटली
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही बांगलादेशातील सिनिअर फॅक्ट चेकर तौसिफ अकबर यांच्याशी बोललो ज्यांनी हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याची पुष्टी केली आणि त्यात बांगलादेशी लष्कर दाखवले.
निष्कर्ष: बांग्लादेशमधील व्हिडिओ जेथे लष्कराने धार-धार शस्त्रांनी दुकानांची तोडफोड करणाऱ्या दोन दरोडेखोरांना पकडले. तो व्हिडीओ भारतातील असल्याचा सांगून खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.