इंटरनेट फार निर्दयी गोष्ट आहे! भल्याभल्यांची इथे चीरफाड होते. आपणही आपलं एखादं मत नेटवर मांडलं तर लगेच तोफाबंदुका घेऊन आपला चेहरा जन्मात न पाहिलेले लोकही त्यांच्या कमेंट्स घेऊन दिवे लावायला हजर!
सेलेब्रिटींनाही जाम ट्रोल केलं जातं. अर्थात यामध्ये मजाही असते म्हणा. आलोक नाथ, रजनीकांत अशा स्वत:ची एक इमेज तयार झालेल्या अॅक्टर्सवर येणारे जोक्स तर आपल्याला माहीत आहेतच. पण ‘खाना खजाना’ फेम शेफ संजीव कपूर यांच्यावरही अचानक जोक्सचं पीक येतं.
खाना खजाना मधून ९० च्या दशकात संजीव कपूर तुफान फेमस झाले होते. त्यांची बोलण्याची एक मृदू पध्दत, बोलका चेहरा सगळ्यांनाच भावला होता. आणि एखादी रेसिपी सांगतानाही ते अशा छान पध्दतीने सांगायचे की क्या बात है!
तर या संजीव कपूरवरही धमाल पीजे येत असतात. वाचा
१. फॅमिली मॅन
बायको: अहो पाणी गेलंय..
संजीव कपूर : और ये लीजिये बैंगन का भर्ता. आ गया ना मुँह में पानी!
२. संजीव कपूर शाळेत असताना
शिक्षिका: तर सांगा मुलांनो, आपल्या जीवनात कुठले तीन शब्द सर्वात महत्त्वाचे असतात?
संजीव कपूर (हात वर करत) : नमक स्वाद अनुसार!
Teacher: “Okay kids, what are the three magic words?”
Sanjeev Kapoor : *raises hand*
Teacher: “Yes”
Sanjeev Kapoor: “Namak swaad anusaar”
— Akshar (@AksharPathak) October 10, 2015
३. वैवाहिक सुखसंवाद
बायको: माझे हात कोरडे पडलेत. क्रीमपण संपलंय
संजीव कपूर: इन्हें पानी में रातभर भिगो के रखें
४. किती ते! संजीव कपूर (व्यायाम करून आल्यावर पाणी पिताना) : वाह क्या स्वाद है…मुँह में पानी आ गया
संजीव कपूरची ही सगळी पेटंट वाक्यं तुम्ही वाचताना मनात त्यांच्याच आवाजात वाचली असणार! असे जोक्स नेटवर खोऱ्याने पडले आहेत. संजीव कपूर काय किंवा आलोक नाथ काय, त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे आणि त्यांच्या भूमिकांमधून निर्माण झालेल्या त्यांच्या इमेजमुळे ते देशभर लोकप्रिय आहेत. हे सगळे जोक्स म्हणूनच त्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेले नाहीत. या जोक्समधून त्यांच्यावर लोकांचं असणारं प्रेमच दिसून येतं.
आता आलोक नाथांचा विषय निघाला आहे तर जाता जाता त्यांच्यावरचा जोक होऊन जाऊ दे
हनी सिंग (मुलीकडे पाहत गाणं गाताना ) : … I swear छोटी ड्रेस में बाँब लगती मेनु…
पण आलोक नाथ : छोटी ड्रेस में ठंड लग जायेगी बेटा !
आयुष्यात किती वेळ वाकडा चेहरा करत टेन्शनमध्ये रहायचं? हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे (वा वा!)
अति झालं पण भावना पोचल्या!