Maldives Beach Dead Body Found Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही फोटोंनंतर सोशल मीडियावर लक्षद्वीप विरुद्ध मालदीव अशा वादाला तोंड फुटले होते. मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेने या वादाची ठिणगी आणखीनच पेटली. अशातच आता लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. ज्यामध्ये मालदीवच्या सहलीला गेलेली एक तरुणी समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा दावाही या पोस्टमध्ये केलेला आढळून येतो. चौकशी केली असता पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आले. मात्र खरी घटना सुद्धा तितकीच थक्क करणारी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

पूर्व ट्विटर म्हणजेच X यूजर रजत शर्माने त्याच्या प्रोफाइलवर व्हायरल पोस्ट शेअर केली.

इतर वापरकर्ते देखील हीच पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही Yandex सर्च इंजिन वापरून पोस्टवर रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून तपास सुरु केला. Yandex द्वारे आम्हाला thehooksite.com वर एका आर्टिकल बरोबर हा फोटो आढळून आला.

https://thehooksite.com/dead-body-on-beach-had-everyone-on-edge-before-police-identify-what-it-actually-is/

रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावरचा एक शांत दिवस अचानक मोठ्या गोंधळात बदलला. समुद्रकिनाऱ्यावर आढळलेला मृतदेह प्रत्यक्षात काय आहे हे पोलिसांनी ओळखण्याआधी सगळेच घाबरले होते. अधिकार्‍यांनी या घटनेची चौकशी केली असता, धक्कादायक सत्य समोर आले, एका अगदी खऱ्या वाटणाऱ्या सेक्स डॉलला लोक मृतदेह समजले होते. आम्हाला विविध बातम्यांच्या वेबसाइटवर या घटनेबद्दलचे अनेक रिपोर्ट्स आढळून आले.

https://www.indiatoday.in/trending-news/story/dead-woman-on-thailand-beach-turns-out-to-be-a-sex-doll-1991638-2022-08-23
https://nypost.com/2023/06/15/texas-officials-say-deceased-body-found-was-actually-a-dismembered-sex-doll/
https://www.ndtv.com/world-news/rubber-doll-triggers-panic-on-thailand-beach-after-mistaken-for-dead-woman-3279053

तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही मालदीवमधील पत्रकार अहमद अझान यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी पुष्टी केली की सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे मालदीवमध्ये कोणतीही घटना घडली नाही.

निष्कर्ष: थायलंड मधील एक जुनी बातमी जिथे एका सेक्स डॉलला मृतदेह समजून गोंधळ झाला होता त्याच घटनेचे फोटो चुकीच्या दाव्यांसह मालदीवचे सांगून व्हायरल केले जात आहे. हा दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral sex doll image shared as women dead body on beach at maldives post gets angry reaction among lakshadweep vs maldives fight svs