Viral video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, मोठ्या गाड्यांना डाव्या बाजूनं ओव्हरटेक का करु नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओव्हरटेक करतानाखबरदारी घेतली पाहिजे. रस्त्यावर एखाद्याच्या वाहनाला ओव्हरटेक करून कोणी पुढे गेला, की त्याला पाठी सारण्यासाठी काही जण प्रयत्नांची परकाष्टा करतात.काही जण ‘जा बाबा जा’, यासारखी डायलॉगबाजी करून ‘साईड’ देतात; तर काही जण मुद्दाम अडवणूकही करतात. ओव्हरटेकिंगला परिस्थिती अनुकूल नसली, की अपघात होऊन विनाकारण जीवही जातात. म्हणूनच ‘अति घाई संकटात नेई’, ‘दुर्घटना से देर भली’ यांसारखे अनेक संदेश राज्य मार्ग, महामार्गांवर विविध ठिकाणी ठळक अक्षरांत झळकवलेले असतात.

ओव्हरटेकच्या नादात किती मोठा अपघात झाला हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बाईकस्वारानं बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात स्व:चा जीव धोक्यात घातला. इतकंच नाही तर चक्क हा तरुण मृत्यूच्या तोंडातून परत आलाय. हा बाईकस्वार मोठ्या बसला डाव्या बाजुने ओव्हरटेक करायला गेला अन् बस चालकाने तोच टर्न घेतला. यावेळी अक्षरश: तरुणाच्या अंगावरुन बस गेली. नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. विशेष म्हणजे तो स्वत: बसच्या खालून बाहेर आला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम’ भर मांडवात नवरीचा लग्नाला नकार; VIDEO पाहून येईल संताप

अति घाई संकटात नेई!

आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही, सगळ्यांना पुढं जायचं असतं. तुम्ही ड्रायव्हींग करत असाल तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाल आपली गाडी पुढं न्यायची घाई असते. अशावेळी कुठला ड्रायव्हर वा गाडी तुमच्या मार्गात आली तर राग अनावर होता. आणि अशावेळी रस्त्यावर भांडणं होतानाही आपण पाहतो.

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर गाडी चालवताना आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही जीवाचा विचार करावा असा सल्ला देत आहेत.