पिझ्झावर अननस घालून खाणं कुणाला पसंत पडत आहे; तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार म्हणजे पिझ्झाचा घोर अपमान आहे. एकंदरीत असा सगळा वाद चालू असताना आता एका नव्या प्रकारानं बाजारात उडी मारली आहे. या वेळेस पिझ्झावर कुठल्याही प्रकारची अतरंगी फळं घातलेली नसून, चक्क सापाचं मांस वापरल्याचं समजतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हाँगकाँगमधील सेर वोन्ग फन [Ser Wong Fun] या रेस्टॉरंटसोबत मिळून ‘पिझ्झा हट’नं हा जगावेगळा पिझ्झा बनवला आहे. सेर वोन्ग फन हे रेस्टॉरंट सापापासून बनवल्या जाणाऱ्या हटके पदार्थांसाठी प्रसिद्ध असून, या रेस्टॉरंटची सुरुवात १८९५ साली झाली आहे. त्यांनी सापापासून बनवलेल्या नऊ इंची पिझ्झामध्ये सापाचं बारीक केलेलं मांस, काळे मशरूम व वाळवलेले चायनीज हॅम हे पदार्थ एकत्रितपणे टाकले जातात. त्यावर सुरुवातीला पिझ्झाच्या पावावर पारंपरिक पद्धतीनं लावण्यात येणाऱ्या टोमॅटो सॉसऐवजी अबेलोन [abalone] सॉसचा वापर केला जातो. या सॉसचा वापर केल्यामुळे स्नेक पिझ्झाची चव वाढण्यास मदत होते. मात्र, हा पिझ्झा २२ नोव्हेंबरपर्यंतच विक्रीसाठी असणार आहे, असं सीएनएनच्या [CNN] अहवालानुसार समजतं.

हेही वाचा : Diwali 2023 : यंदा फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडेल; दिवाळी फोटोशूटसाठी लक्षात ठेवा ‘या’ सहा टिप्स….

“चीज आणि चिकनसोबत जर सापाचं मांस खाल्लं, तर त्याची चव अजूनच भन्नाट लागते. हे सर्व पदार्थ एकत्र करून पिझ्झावर टाकून खाल्ल्यानं, खवय्यांना एक भन्नाट चव चाखायला मिळते.” असं हाँगकाँगमधील ‘पिझ्झा हट’नं सीएनएनला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे.

पण, केवळ सापाच्या मांसापासून बनवलेल्या पिझ्झानं लोकांचं लक्ष वेधून न घेता, ‘पिझ्झा हट’च्या अजून एका गोष्टीनंदेखील लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. ‘पिझ्झा हट’कडून स्नेक पिझ्झासोबतच चायनीज प्रिझर्व्ड सॉसेजेसचीदेखील विक्री केली जाणार असल्याचं समजतं. हा पदार्थ हाँगकाँगमधील शरद ऋतूदरम्यान खाल्ला जाणारा एक पदार्थ असून, तो मातीच्या भांड्यात भातासोबत बनवला जातो. त्यामुळे तेथील लोकांच्या मनात स्नेक पिझ्झासोबत या गोष्टीबद्दलही उत्सुकता असल्याचं समजतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral snake meat pizza weirdest combination ever made hong kong gets the credit dha