Viral video: मुलं ही देवाघरची फूलं असतात. त्यांचं मनही अगदी खरं असतं. पण कधीकधी मुलांच्या डोक्यात काय सुरू आहे, याचा अंदाज लावणं कठीण असतं. असंच एका शाळेतल्या विद्यार्थ्यासोबत झालं आहे. अनेकदा परीक्षांशी संबंधित गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुलांच्या उत्तरपत्रिकेत त्यांची गमतीशीर उत्तरंही समोर येतात. नुकतीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे, जी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळा-कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या बुद्धीमत्तेचे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी मुळातच हूशार असतात तर काही विद्यार्थी कसेतरी शिक्षण पूर्ण करतात. काही विद्यार्थी फार क्रिएटिव डोकं लावणारे असतात. सध्या विद्यार्थ्यांच्या अशाच क्रिएटिविटी सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही व्हायरल होत असतात. ज्यातील उत्तरे वाचून डोकं चक्रावून जातं. सध्या असंच एक उत्तर व्हायरल झालं आहे.अशाच एका क्रिएटिव विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सध्या व्हायरल झाली आहे. यात त्याने प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते वाचून तुम्ही पोटधरून हसाल. बघून तुम्ही हेच म्हणाला की, इतकी क्रिएटिविटी यांच्यात येते कुठून? इतकं अभ्यासात लावलं असतं तर पुढे गेला असता.

आता तुम्ही म्हणाल विद्यार्थ्यानं उत्तर पत्रिकेत असं लिहलंय तरी काय? तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असालच. एखाद्याला मेसेज पाठवायचा असेल तिथे तुम्हाला ऑडिओ मेसेज पाठवण्याचाही पर्याय दिसतो. याद्वारे टाइप करण्याऐवजी तुमच्या आवाजात मेसेज पाठवू शकता. ऑडिओ मेसेज पाठवल्यावर एक फाइल सेंड होते आणि ती प्ले करण्याचा ऑप्शन असते. असंच डोकं या विद्यार्थ्यानं लावलंय. पेपरमध्ये या मुलानं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याऐवजी त्यानं उत्तराच्या ठिकाणी ऑडिओ मेसेज बॉक्सचं चित्र काढलं आहे. वेगवेगळ्या उत्तर वेगवेगळे सेकंद लिहिलं आहेत. विद्यार्थ्याचं हे उत्तर पाहून शिक्षकानेही त्याला होत जोडले असतील.

पाहा उत्तरपत्रिका

या मुलाचे हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिलं आहे की, मुलगाही खूप हुशार दिसतो. तर आणखी एकानं “शिक्षकांना काय गुण द्यावे हे सुचलं नसेल” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral student answer sheet makes teacher shocked teacher will be surprise after seeing this student answer sheet photo video viral srk