दिल्लीला लागून असलेल्या साहिबाबाद, गाझियाबादमध्ये काल रात्री एका वराला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाआधी वराची धुलाई का करण्यात आली याचे सत्य जाणून घेतल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या वरासोबत एकदम परफेक्ट झालं असल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वराचे कुटुंब वाचवत राहिले, वधूचे कुटुंब मारत राहिले

सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये वधूच्या कुटुंबीयांनी वराला ओढून मारहाण केली. वराचे नातेवाईक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर लग्नाआधी वराच्या वडिलांनी हुंडा म्हणून १० लाख रुपये रोख देण्याची अट घातली होती. त्याचवेळी वराच्या वडिलांनी सांगितले की, जर आधी पैसे मिळाले नाहीत तर हे लग्न होणार नाही.\

( हे ही वाचा: देसी जुगाड! शेतकऱ्याने भंगारातून बनवली अशी गाडी की त्यापुढे मोठे इंजीनियरही होतील फेल; बघा Viral Video )

मात्र, त्यापूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी तीन लाखांची रोकड आणि एक लाखाची हिऱ्याची अंगठी दिली होती. मात्र एवढाच हुंडा घेऊन वराच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. मुलीच्या लोकांनी खूप विनवणी केली पण प्रकरण काही सुटले नाही.

(हे ही वाचा:‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना मिळते लवकर यश, त्यांच्यावर असतो धन देवता कुबेरचा आशीर्वाद )

वराची यापूर्वी झाली होती दोन ते तीन लग्न

प्रकरण इथेच संपत नाही. हे प्रकरण बाहेर येताच वराची सर्व पोल उघड झाली. मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, काही वेळाने कळाले की वराचे यापूर्वी दोन ते तीन लग्न झाले आहेत. मुलीच्या लोकांनी त्याच्या गुन्ह्याची फोटोही लोकांना दाखवली. आरोपी वराचे नाव मुज्जमिल असून तो आग्रा येथील रहिवासी आहे असे समजते.

( हे ही वाचा: नवरदेवाच्या संतापलेल्या भावाने विवाह सोहळ्यात वहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )

लग्नमंडपात वराला मारहाण झाल्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही देशातील अनेक शहरांमध्ये हुंडा मागितल्याने किंवा वराला मारहाण झाल्यामुळे त्यांचे लग्न मोडले गेले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral the bridegroom was beaten before the wedding when you hear reson you will say that you did it right ttg