Viral Video: आजकाल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रेल्वेस्थानक वा ट्रेनमध्ये प्रवाशांच्या, तसेच बाजारात, मॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत, अनेकांच्या खिशातून गुपचूप पाकीट, मोबाईल काढून चोरटे पसार होतात. त्यामळे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना आपल्या वस्तूंवर विशेष लक्ष द्यावे लागते. मोबाईल किंवा पाकिट चोरी करणाऱ्या चोरांची तुम्ही अनेक व्हिडीओ पहिले असतील. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका चोराने हॉटेलमध्ये जाऊन एका वृद्ध व्यक्तीचा मोबाईल चोरला आहे आणि हॉटेल मालकास याची भनक सुद्धा लागली नाही.

व्हायरल व्हिडीओ राजस्थानचा आहे. राजस्थानच्या जोधपूरमधील एका हॉटेलमध्ये दोन वृद्ध नाश्ता करत होते. दोघे नाश्ता करण्यात आणि एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त असतात. तितक्यात एका अज्ञात तरुणाचा हॉटेलमध्ये प्रवेश होतो. हा तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने आतमध्ये येतो आणि दोन वृद्ध बसलेले असतात त्यांच्या अगदी मागच्या सीटवर बसून राहतो. त्यानंतर दोन-तीन वेळा मागे वळून पाहतो. तसेच मागे बसलेल्या वृद्ध माणसाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करतो. नक्की काय घडतं, वृद्ध व्यक्तींची नजर हटवून चोर मोबाईल चोरण्यास यशस्वी झाला का व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
shashank ketkar shares post about delayed payment
आधी निर्मात्यांवर आरोप, आता व्यक्त केली दिलगिरी! शशांक केतकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “गैरसमज दूर…”

हेही वाचा…केदारनाथला जाण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा? वाहतूक कोंडीच्या ‘या’ VIDEO चा पाकिस्तानशी संबंध काय?

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक अज्ञात तरुण हॉटेलमध्ये प्रवेश करतो. नाश्ता आणि संवाद साधणाऱ्या दोन वृद्धांना टार्गेट करतो आणि त्यांच्या मागे जाऊन बसतो. दोन-तीन वेळा मागे पुढे पाहून, आजूबाजूला कोण पाहत नाही आहे ना हे लक्षात घेऊन वृद्ध माणसाच्या खिशात हात घालतो आणि मोबाईल चोरतो. मोबाईल चोरल्यानंतर थोडा सुद्धा वेळ वाया न घालवता तो सरळ हॉटेलबाहेर निघून जातो. तसेच या अज्ञात तरुणाने हॉटेलमध्ये येऊन चोरी केली आहे याचा कोणालाही संशय सुद्धा येत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @abesalleteritho या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ऑनलाइन पोस्ट केल्यापासून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. तसेच या व्हिडीओने राजस्थान पोलिसांचे देखील लक्ष वेधून घेतले आहे. @CP_Jodhpur अधिकृत अकाउंटवरून पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरण लवकरच उघडकीस आणून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या चोरीच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. या प्रकरणांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे असे कमेंटमध्ये म्हणताना दिसत आहेत.

Story img Loader