हिवाळा हा ऋतू अनेकांना आवडतो. कारण हा ऋतू अतिशय प्रसन्न असतो. वातावरणात गारवा असतो. अशावेळी लोक सुट्टीला जातात आणि मजा करतात. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. भारतात तर शिमला-मनाली अशा ठिकाणी या ऋतूत बर्फ पाहायला मिळतो. पर्यटकांना या बर्फाशी खेळणे फार आवडते. पण हा आनंद माणसापुरताच मर्यादित नाही. सध्या सोशल मीडियावर बर्फामध्ये खेळणाऱ्या आणि याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या गायीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदातरी बर्फामध्ये खेळण्याचा आनंद लुटायचा असतो. एका गायीचीही अशीच इच्छा होती आणि ती इच्छा तिने पूर्ण केली आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये डोंगरावरील बर्फवृष्टीमध्ये एक गाय बर्फावरील घसरगुंडीचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी ही गाय बर्फावर बसून डोंगरावरून खाली सरकत येताना दिसत आहे.

Viral Video: दोन बैलांमध्ये झाली खतरनाक झुंज; मारामारी करत घरात घुसले आणि…; पाहा शेवटी कोण जिंकलं

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. Buitengebieden या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास २.३ मिलिअनहूनही अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर एक लाखांहुनही अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral this is the real fun netizens are delighted with the video of a cow sliding on a snowy mountain pvp