Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाच्या या जमान्यात आपलाही एखादा व्हिडीओ व्हायरल व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी मग इतरांपेक्षा काहीतरी हटके करण्याचे प्रयत्न सुरु होतात. पण अनेकदा या प्रयत्नांमध्ये आपला जीव धोक्यात घातला जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. कारण या व्हिडीओत रिल बनवण्यासाठी चालकाने हातातलं स्टेअरिंग सोडून दिलेलं आहे. या व्हिडीओवरुन अनेकांनी खडे बोल सुनावले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती चक्क त्यांच्या पायांनी कार चालवत आहेत. हा व्यक्ती कारचे स्टीयरिंग असलेल्या सीटवर बसायाचे सोडून बाजूच्या सीटवर आरामात बसलेला दिसत आहे. त्यामध्ये गाडीवरुन जात असलेल्या तरुणांना हा व्यक्ती कार अशा प्रकारे चालवताना दिसतात. तरुणांना पाहिल्यानंतर व्यक्ती कारच्या सीटवरून सरळ होऊन बसतात आणि तरुणांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागतात.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Thane, passenger Thane railway station, train and platform,
VIDEO : रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीत सापडलेल्या प्रवाशाला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान

धक्कादायक VIDEO

दरम्यान, हायवेवर हा प्रकार सुरू असल्यामुळे या तरूणांना पोलीसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तर अशा स्टंटबाजीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यायला पाहिजे. असे स्टंट जीवावरसुद्धा बेतू शकतात. हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र हा व्हायरल व्हिडीओ कुठल्या शहरातील हे समजू शकलेलं नाही. मात्र अशाप्रकारे लोक इतरांच्याही जिवाश खेळत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपनंतर ढसाढसा रडत होती तरुणी, धोकादायक पाऊल उचलणार तेवढ्यात…VIDEO व्हायरल

@1no_aalsi_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

Story img Loader