पाळीव आणि वन्य प्राण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. या व्हिडीओमधून मनोरंजन होत असल्याने नेटकऱ्यांची त्याला चांगलीच पसंती मिळत असते. सध्या गायीचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये गाय ट्रकच्या छतावर उभी असलेली दिसून येत आहे. ट्रकमधील केबिनच्या छतावर उभी असलेल्या या गायीला पाहून लोकांना हसू आवरत नव्हतं. तुम्ही सुद्धा हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहा.
समोर आलेला हा व्हिडीओ पाहून असं दिसतंय की, एक ट्रक चालक आपल्या ट्रकमध्ये गायी भरून नेत होता. महामार्गावरून ट्रक चालवत असताना या ट्रक चालकाला कंटेनरच्या आत काहीतरी आवाज आल्यानंतर संशय आला होता. त्यानंतर त्याने जे पाहिलं पाहून फक्त ट्रक चालकालाच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांना देखील हसू आवरलं नाही. ट्रकच्या कंटेनरमधून एक गाय बाहेर पडून ती थेट ट्रकमधील केबिनच्या छतावर जाऊन पोहोचली.
आणखी वाचा : बकरी आणि गाढवाच्या मैत्रीचा VIDEO VIRAL, झाडाची पानं खाण्यासाठी केला असा जुगाड…
हे दृश्य फारच मजेदार आहे. कंटेनरमधून ही गाय चक्क केबिनच्या छतावर गेली असल्यामुळे सारेच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या गायीला परत कंटेनरमध्ये जाऊन देण्यासाठी ट्र्क चालक एका काठीच्या सहाय्याने तिला मागे जाण्यााठी भाग पाडत होता. परंतू ही गाय इतकी निडर होती की त्या काठीलाही ती घाबरली नाही. ती आहे त्याच जागी उभी राहलेली पाहून सारेच जण अगदी पोट धरून हसू लागले. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीची हास्य स्पष्टपणे दिसून येत आहे. जणू काही या गायीला कंटेनरमधून बाहेर येऊन मोकळ्या हवेत येण्याची इच्छा झाली असावी.
आणखी वाचा : “पप्पा आमच्यासाठी काम करतात, ते जेवणही करत नाहीत,” या चिमुकलीचा भावूक VIDEO VIRAL
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आव़डू लागलाय. लोक या व्हि़डीओचा भरपूर आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करून अवघे ११ तास उलटले आहेत, तरी आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर वेगवेगळे विनोदी कमेंट्स शेअर केले आहेत.
आणखी वाचा : गुलाबी थंडीत ब्लँकेटच्या आत मुलगी जे करत होती ते पाहून आई हैराण झाली, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा म्हशीला राग येतो…, असा केला हल्ला की सारेच जण गेटमधून बाहेर पडले
गाईचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरला आहे. असेच काहीसे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे जे याआधी क्वचितच दिसले असेल. यामध्ये एक गाय ट्रकच्या डब्यावर चढली आणि थेट त्याच्या केबिनच्या छतावर उभी राहिली. काही वेळातच हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.