Ant Face Close Up Photograph:आजवर आपण सोशल मीडियावर प्राण्यांचे अगदी जवळून टिपलेले सुंदर फोटो पाहिले असतील. पण तुम्ही कधी मुंगीचा क्लोज अप फोटो पाहिला आहे का? छायाचित्रकार युजेनिजस कावालियास्कस यांनी काढलेला मुंगीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मायक्रोस्कोपचा वापर करून काढलेल्या या फोटोमध्ये मुंगीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून कोणाच्याही काळजात धडकी भरू शकते. मुंगीचा चेहरा कसा दिसतो हे दाखवणारा हा जगातील पहिलाच फोटो असावा.

एखाद्या हॉरर चित्रपटाच्या पोस्टरवर शोभावा इतका भयंकर फोटो कावालियास्कस यांनी आपल्या कॅमेरात कैद केला आहे. युजेनिजस कावालियास्कस हे एक प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार असून २०२२ च्या निकॉन कंपनीने आयोजित केलेल्या फोटोमायक्रोग्राफी या स्पर्धेत त्यांनी मुंगीचा हा मायक्रोस्कोपिक फोटो सादर केला होता. आपल्याला फोटोवरूनही अंदाज येऊ शकतो की मुंगीच्या चेहऱ्यावरील हे बारकावे कोणत्याही उपकरणाशिवाय मानवी डोळ्यांना दिसणे जवळपास अशक्यच आहे.

कावालियास्कस यांनी इनसाइडरला सांगितले की, “मुंगी शोधणे हे फार कठीण नसले तरी ती सतत धावत असताना तिचा स्थिर फोटो काढणे हा मोठे टास्क होता” कावालियास्कस म्हणतात की फोटोग्राफीचे मूळ उद्दिष्ट हे नवनवीन शोध घेणे असायला हवे, मी नेहमीच तपशिलांवर लक्ष देतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो कि तंत्रज्ञानाच्या मदतीने तरी आपण निसर्गाच्या इतक्या सुदंर रचना जवळून पाहू शकत आहोत, निसर्ग हा भयंकर नसून सुंदर आहे”

पाहा मुंगीचा चेहरा कसा दिसतो?

दरम्यान मुंगीच्या या फोटोने ऑनलाइन वाहवा मिळवली असली तरी या स्पर्धेत ग्रिगोरी टिमिन यांनी टिपलेल्या फोटोला पुरस्कार मिळाला आहे . मादागास्करच्या एका विशाल डे गेकोच्या भ्रूणाच्या हाताचा फोटो टिमीन यांनी टिपला होता .या फोटोमध्ये इमेज-स्टिचिंग पद्धतीचा वापर करून शेकडो प्रतिमा एकत्र विलीन करून गेकोची प्रतिमा तयार करण्यात आली होती.

Story img Loader