आजकाल सोशल मीडियावर स्टंट करणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही स्टंट तर अगदी जीवघेणे असतात. अशा स्टंटमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. तरीही अनेक तरुण सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असे अनोखे आणि धोकायदक स्टंट करत असतात. सध्या अशाच एका मुलाने केलेल्या भयंकर स्टंटच्या व्हिडीओने तर सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

कारण या व्हिडीओमधील मुलाने चक्क एका मगरीला आपल्या बाईकवर झोपवून तो स्वत: तिच्या अंगावर बसून गाडी चालवण्याचं धाडस केलं आहे. खरंतर धोकादायक प्राण्यांसोबत असले स्टंट करणं सोपं काम नाही, कधी ते आपल्यावर हल्ला करतील हे सांगता येत नाही. या पृथ्वीवर असे अनेक प्राणी आहेत ज्यांना पाहून लोक दूर पळण्याचा प्रयत्न करतात. सिंह, चित्ता, हत्ती, साप यांसारखे प्राणी बघून लोकांचे हात पाय थरथरायला लागतात.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar grahmakh photos viral
लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर

हेही पाहा- Video: ८८ व्या वर्षी आजोबांचं नशीब पालटलं, जिंकली ५ कोटींची लॉटरी; म्हणाले “३५ ते ४० वर्षापासून…”

या प्राण्यांसारखीच मगर असते. शिवाय मगरीला तुम्ही कधी जवळून पाहिले असेल तर तुम्हाला ती किती भयंकर दिसते हे सांगण्याची आवश्यकता नाही. अशा भयंकर मगरीच्या अंगावर बसून एका मुलाने बाईकवरुन प्रवास केला आहे असं सांगितलं तर तुम्हाला ते पटणार नाही. पण सध्या अशा घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण मुलाने आपल्या बाईकवर एक महाकाय मगर बांधली आहे. मगरीला बाईकच्या सीटवर झोपवून तो स्वत:ही मगरीवर बसला आहे. या मुलाने मगरीचे तोंड आवळून बांधले असून तो रस्त्यावरून भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. त्याचा हा भलता प्रकार कोणीतरी कॅमेरामध्ये व्हिडिओ शूट केला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा- Video: जुनी कार चालवणं जोडप्याच्या अंगलट, रागवलेल्या पोलिसांनी महिलेला काच फोडून बाहेर खेचलं अन्…

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओमधील मगर तस्करीसाठी नेली जात असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. मात्र, अद्याप याबाबतचे सत्य समोर आलेले नाही. व्हायरल होत असलेल्या हा भयंकर स्टंटचा व्हिडीओ oy._.starrr नावाच्या इंन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४१ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय तो पाहून अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये काही लोकांनी या व्हिडीओतील दृश्यांचा निषेध करणाऱ्या तर काहींनी विनोदी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “ही क्रूरता असून लोकं यातून मनोरंजक कंटेंट कसा बनवतात याची कल्पनाही करू शकत नाही, थोडी माणुसकी दाखवा.” तर दुसऱ्या नेटकऱ्यांने “हा मुलगा झोमॅटोवरील ऑर्डर पोहचवायला निघाला आहे” अशी मिश्कील कमेंट केली आहे.

Story img Loader