कामानिमित्त अनेक महिलांना रोज घराबाहेर पडावं लागतं, त्यात जर रात्री उशिराची शिफ्ट असेल तर सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. यामुळे कित्येक महिलांना कामासाठी कुटुंबाकडुन विरोधही केला जातो. मुंबईत मात्र अनेकजणींना याबाबत फारशी चिंता करावी लागत नाही, कारण रात्रीच्या अगदी शेवटच्या ट्रेनमध्ये सुद्धा महिलांच्या प्रत्येक डब्ब्यात त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी असतात. याबद्दल रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला काय वाटते, तिच्या भावना व्यक्त करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई लोकलमध्ये एक पोलीस कर्मचारी उभा असलेला दिसत आहे. या व्हिडीओ च्या कॅप्शनमध्ये ‘जेव्हा ती एकटी रात्रीच्या वेळी प्रवास करते’ असे लिहले आहे. या व्हिडीओतून रात्रीच्या वेळी मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या असंख्य महिलांच्या भावना सांगण्यात आल्या आहेत. पोलीस कर्मचारी सदैव त्यांचे कर्तव्य निभावत असल्यामुळे या महिलांना कोणतीही चिंता सतावत नाही. पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आपण सुरक्षित प्रवास करू शकतो, असे या महिलांचे मत असते. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पोलीस कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटेल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा : चक्क डोक्यावर बाइक घेऊन तो बसवर चढला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा : छताला चिकटलेला फुगा काढण्यासाठी त्याने मुलालाच वर फेकले अन्…; Viral Video पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओला ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकीच्या मनात या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सुरक्षेची भावना येते, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.