Viral Video: उन्हाळ्याच्या झळा जशा माणसांसाठी त्रासदायक असतात. तशाच त्या प्राण्यांसाठीही असतात. मानवाप्रमाणे त्यांनाही योग्य आणि पोषक अन्न,पाण्याची गरज असते. प्राण्यांना डिहायड्रेशनची समस्या होऊ नये म्हणून त्यांना पुरेसं पाणी देणं महत्वाचे आहे.पण, सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यामध्ये एक तहानलेला उंट रस्त्याकडेला पडून आहे.
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी माणसं कूलर, एसी, पंखा यांचा उपयोग करतात. मात्र, प्राण्यांच काय ? त्यांना मात्र कोणताच आधार नसतो.वृक्षतोडीमुळे प्राणी-पक्षांची हक्काची जागा शहरातून कमी होत आहे. त्यामुळे अन्न-पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या प्राण्यांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास होत आहे. व्हायरल व्हिडीओत पाण्याच्या शोधात उंट रस्त्याकडेला झोपलेला दिसत आहे. त्याची प्रकृतीही बिघडत चालली आहे. तेव्हा देवदूत बनून एक वाहन चालक तिथे येतो.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रस्त्यावरुन ट्रक चालक येत असतो तेव्हा त्याला काहीतरी दिसतं ; त्यामुळे तो आपल वाहन थांबवतो आणि नंतर त्याला रस्त्याच्या कडेला एक उंट तहानलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसतो. तो खूप थकलेला, बेशुद्ध रस्त्यावर पडलेला दिसतो आहे. हे पाहताच त्या माणसाने काहीही विचार न करता त्याला पाण्याची बाटली आणली व उंटाला पाजताना दिसला.
सोशल मीडियावर व्हिडीओ @AMAZlNGNATURE या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. उंट एका वेळेला वीस गॅलन किंवा त्यापेक्षा अधिक पाणी पिऊ शकतो असे म्हंटले जाते. तर पुरेसं पाणी न पिल्यामुळे बहुदा उंटाची प्रकृती बिघडल्याचे दिसून आले आहे. पण, ट्रक चालकाने वेळीच येऊन उंटाला पाणी दिलं हे पाहून सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक होत आहे.