Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला भन्नाट उखाणा घेताना दिसतेय.
उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणतेही शुभ कार्य असो किंवा लग्न आवडीने उखाणा घेतला जातो. डोहाळजेवण असो किंवा करवली किंवा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम महिला उखाणा आवर्जून घेतात. या व्हिडीओमध्ये अशाच एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात एक महिलेने सुंदर उखाणा घेतला आहे. तिचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. मुंबईकरांना हा उखाणा तर खूप आवडेल. या उखाण्यावरून तुम्हाला कळेल की ही महिला समुद्रप्रेमी आहे. तुम्हालाही समुद्र खूप आवडत असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल उखाणा व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ डोळाळेजेवण कार्यक्रमातील आहे. ज्या महिलेचे डोहाळे जेवण आहे ती महिला उखाणा घेते. उखाणा घेताना ती म्हणते, “दादर चौपाटीवर बसून आवडते मला बघायला समुद्राची लाट, गौरवरावांच्या छोट्या व्हर्जनची पाहते मी मनापासून वाट” हा उखाणा ऐकून इतर महिला सुद्धा ‘खूप मस्त’ म्हणत या महिलेचे कौतुक करतात. हा भन्नाट उखाणा ऐकून काही लोकांना मुंबईची आठवण येईल तर काही लोकांना दादरच्या चौपाटीची आठवण येईल. समुद्रप्रेमी लोकांना हा उखाणा मनापासून आवडेल. सध्या हा उखाणा चांगलाच व्हायरल होत आहे. उखाणा ऐकण्यासाठी तुम्ही खालील व्हिडीओ पाहू शकता.

हेही वाचा : लग्नाचा आहेर घेण्यासाठी नवरीचा जुगाड! मेहंदीने हातावर कोरला QR Code, गुगलने शेअर केला व्हिडीओ

ukhane_by_neha_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डोहाळजेवण विशेष उखाणा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान उखाणा” तर एका युजरने लिहिलेय, “किती गोड उखाणा आहे” अनेक युजर्सना हा उखाणा खूप आवडला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. ukhane_by_neha_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक सुंदर सुंदर उखाण्यांचे व्हिडीओ शेअर केले जातात.