Delhi Vada Pav Girl: मुंबईच्या वडा पावसारखी चव दुसरीकडे कुठेच मिळणार नाही असे अनेकजण म्हणतात. पण दिल्लीमध्ये मुंबईच्या वडापाव विकणारी तरुणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहा, सर्वत्र तिचेच त्याचे व्हिडिओ दिसतात. तिच्याकडे वडापाव साठी ग्राहकांची मोठी रांगच रांग लागली आहे. दरम्यान या तरुणीचा रडताना एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तिची व्यथा सर्वांना सांगत आहे.

तुमच्याकडे कितीही पदवी असली तरीही आपल्याकडे नोकरीची कमतरता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चाट स्टॉल आणि चहा कॅफे उभारणारे अनेक उच्चशिक्षित तरुण पाहिले असतील. एमबीए चायवाला असो, बी टेक पाणीपुरीवाली असो की पीएचडी पकोडेवाली…..सोशल मीडियावर असे लोक चर्चेत येत असतात. स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी जरी त्यांचे कौतूक केले जात असले तरी प्रत्यक्षात या कामासाठी किती कष्ट करावे लागतात याची कल्पना कोणालाही नसते.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”

या महिलेचे नाव चंद्रिका गेरा दीक्षित असे आहे. या आधीती हल्दीराममध्ये काम करत होती. ही महिला आपल्या पतीबरोबर वडापाव विकण्याचे काम करते आहे. काही व्हिडिओंमध्ये असे दिसून आले की, तिच्या स्टॉलवर वडापाव खाण्यासाठी मोठी रांग लागत आहेत दरम्यान एकाच वेळी अनेकांना वडापाव देतना दिसत आहे. वडा पाव खाण्यासाठीही लोक तासनतास वाट पाहत आहे. व्हिडिओमध्ये ती लोकांच्या गर्दीमुळे गोंधळली आहे. वडापाव खरेदीसाठी अनेक जण येतात त्यामुळे रस्त्यावर गर्दी होते. वाहतूक पोलिस वारंवार रस्त्यावर पार्किंग करू नये अशी ताकीद देत आहेत.

एका व्हायरल व्हिडीओमध्ये तिने सांगितले की , त्यांच्या मुलाची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. पती-पत्नी दोघांनीही नोकरी सोडून वडा पाव स्टॉल लावला. स्वयंपाक हा तिचा छंद होता, या छंदाचे रूपांतर तिने व्यवसायात केल्याचे ती सांगते.

हेही वाचा – कपडे इस्त्री करण्यासाठी महिलेने वापरला प्रेशर कुकर; जुगाड पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले……

ती सांगते की, दिल्लीत बहुतेक लोक आलू टिक्की वडा पाव म्हणून खायला देतात. पण ती मुंबईसारखा वडापाव बनवते. चंद्रिका सांगते की, ती मूळची इंदौरची मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे आणि दिल्लीतील लोकांना मुंबईच्या वडापावची चव देत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिचा हा व्हिडिओ तुफाना व्हायरल होत आहे. दरम्यान आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती रडतानाही दिसत आहे. कारण तिचा स्टॉल हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे तिने सांगितले. पोलिसांसह अधिकाऱ्यांनी तिचा स्टॉल बंद करण्यासाठी तिला धमकावले आहे असा दावा तिने व्हिडिओमध्ये केला आहे.

कथित धमक्यांचे कारण काय?

त्यांनी तिला स्टॉल बंद करण्यास का सांगितले याचे काही कारण स्पष्ट केलेले नाही. महिला व्हिडीओमध्ये फोनवर बोलताना सांगते की, “त्यांना फक्त पैसे पाहिजेत. त्यांना ३०,०००- ३५००० रुपये आदल्या दिवशी दिले आहेत. सगळा पैशांचा खेळ आहे. “

महिलेचा दावा आहे की अधिकारी तिला तिचे दुकान बंद करण्याची किंवा तिचे सामान काढून घेण्याची धमकी देत ​आहे. मग, रडत असताना, ती तिच्या भावाला फोन करते आणि मदतीची याचना करते.

हेही वाचा – मेट्रोत बसायला जागा देत नाही बघताच…महिलेने भांडताना केला भलताच प्रताप! Viral Video पाहून संतापले नेटकरी

तिचा स्टॉल कुठे आहे?

नुकत्याच प्रकाशित झालेल्या टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, नॅशनल कॅपिटल रिजनच्या सैनिक विहार येथे महिलाचा वडापावचा स्टॉल आहे. असंख्य लोकांनी महिलेच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त केली. ते असा युक्तिवाद करतात की वडा पाव विकणे कायदेशीर आहे आणि तिला अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागू नये. व्हिडीओमध्ये तिचा वडापाव घेण्यासाठी लोक तासनस रांगेत उभे राहतात, असे ती स्वतः सांगते. पण सोशल मीडियावर काही लोकांचे म्हणणे आहे की, जर तिच्या जागी कोणी पुरुष असता तर गाडीवर लोकांच्या इतक्या लांबलचक रांगा लागल्या नसत्या.