Viral Video: वडापाव म्हणजे मुंबईकरांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. वडापाव आवडत नाही असा एकही मुंबईकर तुम्हाला शोधून सापडणार नाही. पण, काही दिवसांपासून दिल्लीच्या एका ‘वडापाव गर्ल’ची चर्चा होत आहे. चंद्रिका दीक्षित असं महिलेचं नाव आहे ; जी मुंबईसारखा वडावपाव विकण्यात प्रसिद्ध आहे. दिल्लीची ही वडापाव गर्ल एक वडापाव ५० रुपयांना विकते. तसेच मुंबईसारखा वडापाव विकत घेण्यासाठी तिच्या स्टॉलवर लाखो लोकांची गर्दी असते. पण, ५० रुपयांना एक वडापाव विकणाऱ्या या महिलेला तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तर ग्राहकांना दिलेल्या वागणुकीवरून प्रचंड ट्रोल करण्यात येत असते. पण, आज वडापाव गर्ल तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे.
व्हायरल व्हिडीओत फोर्ड मस्टँग आलिशान कार दिसते आहे. या कारसमोर अनेक नागरिकांची गर्दी दिसते आहे. गर्दीतील काही नागरिक फोर्ड मस्टँग कारसमोर एवढी गर्दी का आहे ? असा संवाद साधत आलिशान कारची डिक्की उघडतात. तेव्हा वडापाव गर्ल त्यात झोपलेली दिसते आहे तसेच ‘लवकरच काहीतरी खास घेऊन येणार आहे’ असे संकेत सुद्धा देताना दिसते आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, फोर्ड मस्टँग कारच्या डिक्कीतून बाहेर येत असताना चंद्रिका दीक्षितला एक अज्ञात व्यक्ती प्रश्न विचारीत असते. वडापाव स्टॉलचं काय झालं ? या आलिशान कारमध्ये वडापाव विकणार का ? तर यावर चंद्रिका दीक्षित सांगते की, ‘वडापाव बरोबर काही तरी खास घेऊन येणार आहे. थोडा वेळ वाट पाहा’… हे ऐकताच आजूबाजूचे नागरिक जोरजोरात टाळ्या वाजवताना दिसत आहेत. आता नक्की काय आनंदाची बातमी असणार आहे यासाठी सगळ्यांनाच थोडी वाट पाहावी लागणार आहे.
जमलेल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर चंद्रिका दीक्षित आलिशान गाडीत बसते आणि गाडी चालवण्यास सुरुवात करते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chandrika.dixit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘वडापाव गर्ल मस्टँग कारमध्ये वडा पाव विकू लागली’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून वडापाव गर्लचे चाहते तिचं अभिनंदन करताना कमेंटमध्ये दिसत आहेत.