जेव्हा आपलं बाळ पहिल्यांदा आई-वडिलांपैकी एखाद्याला हाक मारतो तेव्हा आभाळ ही ठेंगणं पडतं एवढा आनंद होतो. आपल्या बाळाची पहिली हाक ऐकण्यासाठी त्याचे आई-वडील उत्सुक असतात, त्या आनंदाला कशाचीच तोड नाही. पण मूक बधिर आई-वडिलांना त्यांच्या बाळाने त्यांच्यासोबत साधलेला पहिल्या संवादाचा काय आनंद असतो, हे अनुभवणं फारच कठिण होऊन जातं. पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका बाप-लेकीच्या व्हिडीओनं साऱ्यांचंच मन पिघळून टाकलंय. या व्हिडीओमध्ये ऐकू न शकणाऱ्या वडिलांसोबत त्यांच्या एक वर्षीय चिमुकलीने चक्क सांकेतिक भाषेत संवाद साधलाय. हे पाहून कर्ण बधिर वडील सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. बाप-लेकीचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावुक व्हाल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील कर्ण बधिर वडील झॅकरी हे त्यांच्या अवघ्या एक वर्षाच्या मुलीला घेऊन शॉपिंग मॉलमध्ये आले होते. या एक वर्षीय चिमुकलीचं नाव मॅडिसन असं आहे. सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करत हे बाप-लेक फिरत असताना या चिमुकलीच्या कानावर एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. हे तिला तिच्या वडिलांना सांगायचं होतं म्हणून तिने आपल्या हातातल्या वस्तू खाली ठेवल्या आणि आपल्या इवल्याश्या दोन हातांनी सांकेतिक भाषा वापरून तिने आपल्या वडिलांना कुणीतरी बाळ रडत असल्याचं सांगितलं. इतकंच काय ज्या दिशेने आवाज येतोय तिथे इशारा करत तिथे कुणी तरी बाळ रडत असल्याचं तिने वडिलांना सांगितलं. आपल्या लेकीनं आपल्यासोबत पहिल्यांदा त्यांना समजेल अशा सांकेतिक भाषेत संवाद साधला हे पाहून कर्ण बधिर पिता सुद्धा भावुक झाले. हा इमोशनल व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : १४० रुपये देऊन फूड ब्लॉगरने चाखली या विचित्र पदार्थाची चव!, चेहऱ्यावरचे हावभाव एकदा पाहाच…
आणखी वाचा : Thane Temple Theft: आधी देवाच्या पाया पडला आणि मग पळवली दान पेटी; हनुमानभक्त चोराचा VIDEO VIRAL
हा व्हिडीओ कर्ण बधिर वडील झॅकरी यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर भावूक करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला. या व्हिडीओमधील एक वर्षीय चिमुकली मॅडिसन हे ऐकू शकते. पण आपले वडील ऐकू शकत नाही हे इवल्याच्या मुलीला कळतंय आणि त्यांना समजेल अशा सांकेतिक भाषेत तिने वडिलांसोबत पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे सोशल मीडियावर नेटिझन्सची मने हा व्हिडीओ पाहून अगदी पिघळून गेलंय. बाप-लेकीच्या या अनोख्या नात्यावर नेटिझन्स वेगवेगळे प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.
या चिमुकलीला अमेरिकन सांकेतिक भाषा (एएसएल) बद्दल बरंच काही माहित आहे. कारण तिचं कुटुंब याच माध्यमातून संवाद साधत असतं. त्यामुळे या मुलीला सुद्धा ही भाषा अवगत झाली आणि तिच्या वडिलांशी संवाद साधण्यासाठी हीच भाषा वापरली आहे. आयुष्यात कायम स्मरणात राहील असा क्षण शेअर करताना या वडीलांनी ‘आश्चर्यकारक क्षण’ असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलंय.
हा व्हिडीओ आतापर्यंत ५२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर लोकांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देणाऱ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. अनेक प्रौढ मंडळी ही सांकेतिक भाषा शिकण्यासाठी बराच संघर्ष करत आहेत, पण हीच सांकेतिक भाषा ही चिमुकली इतक्या लवकर अवगत करू शकली, याबाबत देखील नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केलंय.