हौसेला मोल नसतं असं म्हणतात. पण हौसेला वय देखील नसतं हे शंभरी पार करूनही आपली अनोखी हौस भागवणाऱ्या आजींनी करून दाखवलंय. माणसाला वयाच्या बंधनात न अढकता स्वैर आणि हौशी जीवन जगण्याचा मार्गच आजीबााईंचा हा उत्साह पाहून मिळतो. लहान मुलांना विचारा आजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते? छान छान गोष्ट सांगणारी आजी, मायेच्या हातानं घास भरवणारीही आजीच आठवते. ज्या वयात हातपाय गळून जातात त्या वयात आजींबाईंनी चक्क पॅराजम्पिंग करून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पॅराशूट रायडिंग आणि स्कायडायव्हिंग करताना तरूणांच्याही मनात धडकी भरते. मग विचार करा १०३ वर्षाच्या आजींनी हे पॅराजम्पिंग कसं केलं असेल? पॅराजम्पिंग सारखे धाडसी खेळाचा आनंदाचा घेण्यासाठी वय कधी आडवं येत नाही हे या आजीबाईंनी सिद्ध करून दाखवलंय. तरूणांनाही भीती वाटेल असं पॅराजम्पिंग या आजीबाईंनी केलंय. १०३ वर्षाच्या वयातही आपली हौस भागवण्याचा एकदा निश्चय केला की काय कमाल होते, हे आजीबाईंनी करून दाखवलंय. ते ही न दमता, न थकता. तुम्ही विचारात पडले असाल, हे कसं शक्य आहे.

आणखी वाचा : लग्नाचा केक कापणार तेव्हढ्यात नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही की… पाहा हा VIRAL VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये १०३ वर्षाच्या आजींचं नाव रूट लार्सन असं आहे. त्या स्विडनमध्ये राहत असून खूप दिवसांपासून त्यांना पॅराजम्पिंग करण्याची इच्छा होती. पॅराशूट बांधून त्यांनी उंच भरारी घेत आजीने या वयात पॅराशूट जंम्प करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. त्यांच्या पॅराशूट जंप चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : फूड डिलिव्हरीचा हा मजेदार अंदाज एकदा पाहा, Zomato ने लिहिले, ‘ट्राय इट युअर ओन रिस्क’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : थेट ट्रॅक्टरवर बसून नवरीने लग्नात केली धांसू एन्ट्री, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

लॉर्सन यांनी दुसर्‍या पॅराशूट जम्पर जोहानसनसोबत ही पॅराशूट जंम्प पूर्ण केली. यादरम्यान त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य जमिनीवर त्यांची वाट पाहत होते. उडी मारल्यानंतर लार्सन स्वतः म्हणाल्या, “हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते, बऱ्याच दिवसापासून माझी ही इच्छा होती.” तरूणांनाही लाजवेल असा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

त्यांच्या वृद्धाश्रमानं त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत केली. आजी सांगतात की सर्वांनी हा अनुभव घ्यायलाच हवा. यावेळी त्यांच्या या उडीची दखल गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली आहे. आजीबाईंच्या या धाडसी साहसाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, तिच्या जिद्दीने लोक थक्क झाले आहेत. अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलंय. कमेंट सेक्शनमध्ये तर युजर्सनी असंख्य हार्ट इमोजी शेअऱ करत आजींवर प्रेमाचा वर्षाव केलाय. एका युजरने लिहिले की, “किती छान आजी आहेत,” तर दुसर्‍याने लिहिले, “१०३ च्या वयातही ती छान दिसते! मला वाटते की सुखी आणि समाधानी जीवन असंच असतं.”