अनेकदा आपण अशा बातम्या ऐकतो, ज्यामध्ये अमूल्य गोष्टींची तस्करी करणारे लोक एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात. अशीच एक घटना लखनौ विमानतळावर घडली आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी सोमवारी एका प्रवाशाकडून सुमारे १५ लाख रुपये किमतीचे २९१ ग्रॅम सोने जप्त केले. परंतु या सर्व प्रकरणात, या व्यक्तीने ज्या पद्धतीने हे सोने लपवले होते, ती खूपच आश्चर्यकारक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयएएनएसच्या वृत्तानुसार, शारजाहून लखनौ विमानतळावर पोहोचल्यानंतर या प्रवाशाला पकडण्यात आले. एका कस्टम अधिकाऱ्याने सांगितले की, “प्रवाशांच्या प्रोफाइलिंगच्या आधारे आरोपीला ग्रीन चॅनल सोडताना थांबवण्यात आले. त्याची वैयक्तिक झडती घेतली असता त्याने विग घातल्याचे आढळून आले. त्याचे विग हटवल्यानंतर लक्षात आले की काळ्या रंगाच्या चिकटपट्टीने झाकून एक पॉलिथिन त्याच्या डोक्यावर चिटकवण्यात आली होती.

‘मधुचे पाचवे मूल…’; आधारकार्डवरील ‘त्या’ मुलीचं नाव पाहून शिक्षकांना बसला धक्का, शाळेत प्रवेश नाकारला

त्या पॉलिथिनमधून एकूण २९१ ग्रॅम सोने बाहेर आले, ज्याची किंमत १५,४२,३०० रुपये आहे. जप्त केलेले सोने सीमाशुल्क कायद्याच्या कलम ११० अंतर्गत जप्त करण्यात आले आहे. कस्टम कायद्याच्या कलम १०४ अंतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशाला न्यायालयात हजर केले आणि न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. आरोपीला अधिक चौकशीची आवश्यकता नसल्यामुळे, त्याची याचिका ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video 15 lakh gold hidden inside a wig how did he get caught by the police see pvp