Viral video: हसावे की रडावे ते कळत नाही. सध्या एक असाच अनोखा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. तसेच सध्या अलीकडे लोकांनी परील बणवण्याचे, सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी हे रील स्टार किळसवाणा प्रकार करून आता हद्द पार करू लागले आहेत. अशा प्रकारचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जिथे दोन तरुणींनी रील बनवण्यासाठी अक्षरश: मर्यादा ओलांडली आहे.

सार्वजनिक ठिकाणी रील क्रेझची आणखी एक घटना समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, बेंगळुरूमध्ये रस्त्याच्या मधोमध खुर्चीवर बसून चहा पिणारा एक पुरूष. त्याआधी, एका पोलिसाच्या पत्नीने चंदीगडचे रस्ते तिच्या वैयक्तिक डान्स फ्लोअरमध्ये बदलले. आता, अलिकडेच ही घटना लुधियानामध्ये घडली, जिथे दोन महिलांनी एका वर्दळीच्या रस्त्यावर डान्सचा व्हिडिओ तयार केला.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये १७ एप्रिल रोजी लुधियानातील गियासपुरा चौकात एका पुलाखालून दोन महिला नाचताना दिसत आहेत. ‘१००० थिंग्ज इन लुधियाना’ या इंस्टाग्राम पेजने ही रील ऑनलाइन पोस्ट केली तेव्हा या घटनेने लोकांचे लक्ष वेधले, ज्यामुळे अनेक प्रतिक्रिया आल्या.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला दिसत होते, एकीनं बोल्ड ब्लॅक वेस्टर्न स्कर्ट घातला आहे आणि दुसरी चमकदार गुलाबी ड्रेसमध्ये दिसत आहे..रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची वर्दळ दिसत आहे. यावेळी या दोघीही अश्लील पद्धतीनं डान्स करत वाहतूकीमध्ये अडचण निर्माण करत आहे. या दोघांनी एका ऑटोरिक्षाजवळ अश्लील डान्स करत सर्व मर्यादाच ओलांडल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसीपी गुरप्रीत सिंग यांनी आठवण करून दिली की अशा कृतींचे कायदेशीर परिणाम होतील कारण “रस्त्याच्या मध्यभागी रील बनवणे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे”. सिंग यांनी वेबसाइटला सांगितले की त्यांचा व्हिडिओ या प्रकरणाची चौकशी करत आहे. “आम्ही व्हिडिओची पडताळणी करत आहोत आणि त्यात सहभागी असलेल्या मुलींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर सखोल चौकशी केली जाईल”, असे ते म्हणाले.