Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा क्षण असतो. त्यात हल्ली अनेक मुली पैसा, श्रीमंती, सरकारी नोकरी पाहूनच लग्नाला होकार देताना दिसतात. यावेळी दोहोंच्या वयातील अंतरदेखील लक्षात घेतले जात नाही. मुलगा मुलीपेक्षा १५-२० वर्षांनी मोठा असला तरीही त्याची श्रीमंती पाहून लग्न लावून दिले जाते. सध्या अशाच एका शिक्षकाच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका ४० वर्षांच्या शिक्षकाने चक्क २४ वर्षीय तरुणीसह लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघंही भरमंडपात आनंदात नाचताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वधू आणि वर यांच्या वयात खूप मोठा फरक आहे. त्यामध्ये वधू २४ वर्षांची आणि वराचे वय ४० वर्षे असल्याचे सांगितले जातेय. वयात इतका फरक असूनही व्हिडीओमध्ये वधू तिच्या वराला पाहून आनंदाने नाचताना दिसत आहे.

मयंक कुमार पटेल नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जोडप्याचे वय आणि वधूचा उत्साह नमूद करण्यात आला आहे. वर ४० वर्षांचा बीपीएससी शिक्षक आहे. याचा अर्थ त्याला एक सुरक्षित सरकारी नोकरी आहे. त्यामुळेच त्याचे इतक्या लहान वयाच्या मुलीशी लग्न जमले, असा दावा काही जण करीत आहेत.

पाहा व्हिडीओ (Viral Video)

व्हिडीओमध्ये, हे जोडपे लोकप्रिय भोजपुरी गाणे ‘धार कमर राजाजी’वर उत्साहाने नाचताना दिसत आहे. त्यात वधूचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आणि ती भरमंडपातच गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावताना दिसतेय. अनेक युजर्स या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स करताना दिसतायत. काही युजर्स वराच्या वयाची खिल्ली उडविताना दिसत आहेत; तर काही लोक लग्नाला सरकारी नोकरीची कमाल असल्याचे म्हणत आहेत. एका युजरने लिहिलेय की, म्हणून म्हणतो भावांनो, ‘रोज डे’वर नाही, तर रोजगारावर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्याने लिहिलेय की, आपला आनंद इतरांच्या आनंदात आहे.