हवामान बदलाच्या गोष्टींबद्दल आपण अजूनही गंभीर झालेले नसू तर आपल्या आजूबाजूला पाहणे आवश्यक आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना बीचवरील एक बीच हाऊस समुद्राच्या लाटांमुळे ज्या प्रकारे उद्ध्वस्त झाले, तो व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्व्हिसने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
१० मे रोजी लाटा आणि जोरदार वाऱ्यामुळे पडणाऱ्या घराचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. घराचा खालचा भाग उद्ध्वस्त झाल्यानंतर या लाटा घरालाही आपल्यासोबत घेऊन जात आहेत. हे घर रिकामे पडले होते आणि हेटेरस बेटाच्या बाहेरील भागात बांधले होते. मुख्य भूमीपासून ४८ मैलांवर बांधलेले हे घर कोस्टल फ्लडचे बळी ठरले आहे.
टक्कल असणाऱ्यांना हिणवणं ‘लैंगिक छळ’; चिडवणाऱ्यांवर तुरुंगात जाण्याचीही येऊ शकते वेळ
यूएस नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकार्यांनी व्हिडीओ शेअर केला असून एकाच दिवसात अशा प्रकारे पडणारे हे दुसरे बीच हाउस आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. घर कोसळण्याच्या काही सेकंद आधी हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला असून लाटांच्या तडाख्यातून घर पडल्याची घटना यामधून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. सध्या हा परिसर लोकांसाठी बंद करण्यात आला आहे, मात्र वादळामुळे तेथे उपस्थित असलेल्या आणखी नऊ घरांना धोका निर्माण झाला आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, जे घर पडल्यानंतर उद्ध्वस्त झाले, त्याची किंमत £308,000 म्हणजेच भारतीय चलनात सुमारे २ कोटी ९२ लाख रुपये आहे. या परिसरात १५ फूट उंचीच्या लाटा उसळत आहेत, ज्यामुळे समोरील सीहाऊस उद्ध्वस्त होत आहेत. हे धोकादायक फुटेज पाहिल्यानंतर लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका वापरकर्त्याने म्हटले की, ‘प्राधिकरणाने घर वाचवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे.’ तर दुसर्या वापरकर्त्याने लिहिले – ‘अशा घरांच्या बांधकाम करणाऱ्यांना पैसे मिळू नयेत आणि त्यामुळे घरांना विमाही मिळू नये.’ अनेकांनी याला हवामान बदलाचा थेट परिणाम म्हटले आहे.