काही मुली प्रचंड टॅलेंटेड असतात. त्यांचं टॅलेंट पाहून अक्षरश: हैराण व्हायला होतं. जे मोठमोठ्या एक्सपर्टला जमत नाही ते काम ही लहान मुली अगदी चुटकीसरशी करुन दाखवतात. गेल्या काही दिवसांपासून अशाच एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडीओममध्ये तीन चिमुकल्या अप्रतिम स्केटबोर्डिंग करताना दिसून येतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हला ‘पॉवरपफ गर्ल्स या प्रसिद्ध कार्टून मालिकेची आठवण होईल, हे मात्र नक्की.

तुम्ही स्केटिंग करताना आतापर्यंत अनेकांना पाहिलं असेल. ते शिकणं  इतकं सोपं नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बरीच वर्षे ट्रेनिंग घेतल्यानंतरही अनेकांना परफेक्ट स्केटबोर्डिंग करणं जमत नाही, ते या चिमुकल्या तीन मुलींनी करून दाखवलंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तीन मुली इतकं अप्रतिम स्केटबोर्डिंग करताना दिसत आहेत, ते पाहून तुम्ही सुद्धा तोंडात बोटं घालाल.

आणखी वाचा : ताज हॉटेलसमोर ‘Bamb Aagya’ गाण्यावर तरूणीने केला डान्स, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले…

या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियातील एक ७ वर्षांची मुलगी Paige Tobin दिसत आहे, जी स्केट पार्कमध्ये तिच्या दोन मैत्रिणींसह स्केटबोर्डिंग करत आहे. मुली एकामागून एक सिंक्रोनाइझेशन रिंकमध्ये उतरताना दिसत होत्या. एका ओळीत एकमेकांना फॉलो करत आणि नंतर त्याच एकाच रांगेत परत येत असताना त्यांनी स्केटबोर्ड स्टंट दाखवून ट्रेल पूर्ण केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! अजबच…चक्क बकरीसोबत केलं लग्न, घेतली सोबत जगण्या मरण्याची शपथ!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लेकाला सायकलवर आरामात बसता यावं म्हणून आईने केलेला हा Desi Jugaad एकदा पाहाच

हा व्हिडीओ ‘paigeetobin’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ मिलियनहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक करत मुलींच्या टॅलेंटला दाद दिली आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओवर मोठ्या संख्येनं कमेंट करत मुलींच्या स्केटबोर्डिंगचं कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हल्लीच्या मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नसल्याचं अनेकांनी या व्हिडीओवर कमेंटमध्ये सांगितलं. 

Story img Loader